नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला तीन लाखांचा टप्पा

नंदुरबार जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला तीन लाखांचा टप्पा
corona vaccination
corona vaccinationsakal

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना लसीचे (Corona vaccination) तीन लाख २९ हजारवर डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील १९ लाख ८७ हजार ८७५ लोकसंख्येपैकी १८ ते ४४ वर्ष गटातील ८ लाख ३४ हजार ९०८ आणि ४५ वर्षावरील ६ लाख ३३८ व्यक्तींना कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी २ लाख ५१ हजार २६६ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे; तर ५० हजार ९४६ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. (nandurbar-news-corona-vaccination-three-lakh-complate)

नंदुरबार (Nandurbar corona vaccination) तालुक्यात १८ ते ४४ वयोगटातील ५ हजार ७९७ व्यक्तींनी पहिला डोस तर ७७९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ५४ हजार ४९८ व्यक्तींनी पहिला तर १० हजार ९४१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ८९ हजार ३६४ व्यक्तींनी आतापर्यंत लसीकरण करुन घेतले आहे.

corona vaccination
कर्ज काढून देण्यासाठी लाच मागणाऱ्या प्रकल्प अधिकारी गजाआड

लसीकरणासाठी जनजागृतीवर भर

ग्रामीण भागात असलेले गैरसमज दूर करून लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रशासनाने जनजागृतीवर विशेष भर दिला आहे. नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी लोककला, स्थानिक भाषा, बैठका, घरोघरी भेटी आदी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात येत आहे. ग्रामस्तरावरील आरोग्य कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका आदींचा सहभागही महत्वाचा ठरला आहे.

नवापूर : १८ ते ४४ वयोगटातील २ हजार ६४३ व्यक्तींनी पहिला तर ८४ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला. ४५ वर्षावरील ३६ हजार २८३ व्यक्तींनी पहिला तर ४ हजार २१५ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला . एकूण ५७ हजार ३२७ व्यक्तींनी लसीकरण केले आहे.

शहादा : १८ ते ४४ गटातील २ हजार ५०९ व्यक्तींनी पहिला तर २५१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील ५४ हजार ९३५ व्यक्तींनी पहिला तर ११ हजार ५१३ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.असे एकूण ८३ हजार ८०४ व्यक्तींनी लसीकरण करुन घेतले आहे.

तळोदा : १८ ते ४४ मधील २ हजार २४ व्यक्तींनी पहिला डोस तर ६१ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील १९ हजार १७२ व्यक्तींनी पहिला तर ४ हजार २०९ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण ३१ हजार ६१३ व्यक्तींनी लस घेतली.

corona vaccination
धुळे जि.पतील वैयक्तिक मान्यतेच्या सर्वच आदेशांना स्थगिती

अक्कलकुवा : १८ ते ४४ वयातील ७७६ व्यक्तींनी पहिला डोस तर २८० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील १४ हजार ५९ व्यक्तींनी पहिला तर १ हजार २ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण २५ हजार २९४ जणांनी लसीकरण करुन घेतले.

धडगाव : १८ ते ४४ वयोगटातील ५४० व्यक्तींनी पहिला डोस तर ३० व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तर ४५ वर्षावरील ७ हजार ४८९ व्यक्तींनी पहिला तर ४२७ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण १४ हजार ८१० व्यक्तींनी लस घेतली.

जिल्ह्यातील एकूण लसीकरण

– आरोग्य कर्मचारी ः पाहिला डोस - १५ हजार ६७, दुसरा - ८ हजार १८०

– कोरोना योद्धा कर्मचारी ः पहिला डोस - ३५ हजार ४७४, दुसरा - ८ हजार ९७४

– १८ ते ४४ वयोगट ः पहिला डोस - १४ हजार २८९, दुसरा - १ हजार ४८५

– ४५ वर्षावरील वयोगट ः पहिला डोस - १ लाख ८६ हजार ४३६, दुसरा - ३२ हजार ३०७

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com