esakal | विकेंटच्‍या नावाने सर्वच केले लॉक..पण रोजीरोटीचीच चैन ब्रेक; लहान व्यावसायिकांचा प्रश्‍न
sakal

बोलून बातमी शोधा

break the chain

विकेंडच्या नावाखाली पंचवीस दिवसाचा लॉकडाउन घोषीत करत सगळच बंद ठेवल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरीब जनतेसह व्यापाऱ्यांची पोटापाण्याचीच चैन ब्रेक झाली आहे.

विकेंटच्‍या नावाने सर्वच केले लॉक..पण रोजीरोटीचीच चैन ब्रेक; लहान व्यावसायिकांचा प्रश्‍न

sakal_logo
By
योगीराज ईशी

कळंबू (नंदुरबार) : कोरोनाला आळा घालण्यासाठी शासन स्‍तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत व निर्बंध घातले जात आहेत. याला विरोध नाही; परंतु एकदम सगळ बंद केल्याने पोटाला चिमटे टोचून रहावे का? आसा सवाला गोरगरीब जनतेसह लहान व्यापारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना करणे कठोर बंधने लावणे गरजेचे आहे. परंतु सांगायच एक अन् करायचं एक म्हटल्यावर कसं जगायच. दिवसभर काम केल तरच पोटाला भाकर मिळते. त्यातच नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी पंधरा दिवसाचा लॉकडाऊन जिल्ह्यात ठेवला होता. तो संपत नाही तोच विकेंडच्या नावाखाली पंचवीस दिवसाचा लॉकडाउन घोषीत करत सगळच बंद ठेवल्याने हातावर पोट असलेल्या गोरगरीब जनतेसह व्यापाऱ्यांची पोटापाण्याचीच चैन ब्रेक झाली आहे.

भाडे द्यायचे कसे अन्‌ कुटूंबही चालणार कसे
एकीकडे सर्व बंदच्या नावाखाली दारू दुकाने, कारखाने, उद्योग चालु आहे. परंतु हातावर पोट असणाऱ्यांची दुकाने मात्र बंद केल्याने यांनी जगायचं कसं. आधीच पंधरा दिवस जिल्ह्यात लॉकडाऊन ठेवल्यामुळे पंधरा दिवस दुकाने बंद ठेवावी लागली. त्या परत पुढील पंचवीस दिवस बंद ठेवायचे म्हटल्यास दुकानाचे भाडे कसे निघणार. शिवाय कुटुंब कसे चालविणार असा सवाल लहान व्यावसायिकांकडून केला जात आहे. 

शनिवार व रविवार बंद मग गुरुवार, शुक्रवारीही बंद का?
विकेंड लॉकडाऊनमध्ये शनिवार व रविवार या दोन दिवशी संपुर्ण कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जाहीर केले. परंतु गुरुवार व शुक्रवार या दिवसीही सर्व बंद असल्याने सलग चार दिवस बंद लागल्याने लहान व्यवसायिकांची कोंडी होत आहे. 

निर्बध कठोर करा पण वेठीस धरू नका
राज्य सरकारने ‘ब्रेक द चैन’च्या नियमावलीत बदल करणे आवश्यक आहे. निर्बंध अजुन कठोर करावेत. मात्र लहान व्यवसायिकांना अटी शर्तीवर दुकाने सुरू ठेवण्यास सवलत द्यावी. रिकामी गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी; परंतु गोरगरीबाला विनाकारण वेठीत धरू नये. 

संपादन- राजेश सोनवणे

loading image