शहादा, तळोद्यात विनामास्‍क फिरणाऱ्यांवर कारवाई 

कमलेश पटेल
Thursday, 18 February 2021

नागरिकांनी गर्दी करू नये. शासन नियमांचे पालन करावे, कार्यक्रमांमध्ये कमी गर्दी कमी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी संदेशात म्हटले आहे.

शहादा (नंदुरबार) : शहरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघता जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्याने पोलिसांनी गुरुवार (ता. १८)पासून दंडात्‍मक कारवाई सुरू केली आहे. 
पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना जाहीर आवाहन करून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये. शासन नियमांचे पालन करावे, कार्यक्रमांमध्ये कमी गर्दी कमी असणे गरजेचे असल्याचे त्यांनी संदेशात म्हटले आहे. परिस्थिती हाता बाहेर जाऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी आता कठोर पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांना मास्क सक्तीचे केले असून, सॅनिटायझरचा वापर करण्यास सांगितले आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई केली जाईल. आपल्या आरोग्याची काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांनी केले आहे. 

तळोद्यात २० जणांवर कारवाई 
तळोदा : शहरात गुरुवारी विनामास्क फिरणाऱ्या २० जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे एकूण चार हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक नंदराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रवी कोराळे, युवराज चव्हाण आदी कर्मचाऱ्यांनी केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news coronavirus no mask police action shahda