लसीकरण केलेल्यांना मिळणार साखर, तांदूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mla rajesh padavi corona vaccination

लसीकरण केलेल्यांना मिळणार साखर, तांदूळ

शहादा (नंदुरबार) : नांदे (ता. शहादा) व मालदा (ता. शहादा) येथे कोरोना लसीकरणाचा (Corona vaccination) प्रारंभ आमदार राजेश पाडवी (MLA Rajesh padavi) यांच्या उपस्थितीत होऊन या वेळी ४५ वर्षांवरील लसीकरण करणाऱ्या आदिवासी बांधवांना श्री. पाडवी यांनी लसीकरणाला प्रोत्साहन म्हणून जाहीर केल्याप्रमाणे स्वखर्चातून दोन किलो तांदूळ व दोन किलो साखर भेट दिली. (coronavirus vaccination in aadivashi aria mla rajesh padvi)

आमदार राजेश पाडवी म्हणाले, की महाराष्ट्रात कोरोनामुळे लॉकडाउनची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनासारख्या भयंकर आजारावर मात करायची असेल, तर प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक लस घेण्याची गरज आहे. आपणही घ्या व परिवारालाही घेण्यास सांगावे. आपापल्या परिसरात लसीकरणासाठी जनजागृती करावी. काही खासगी संस्थांकडून लसीकरणाचे सर्वेक्षण करण्यात आले.

हेही वाचा: लसीकरण ऑनलाइन नोंदणीत घोळ

गैरसमज असल्‍याने प्रोत्‍साहन

अदिवासी समाजामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल गैरसमज पसरविल्याचे आढळले. त्यामुळे प्रोत्साहन म्हणून ४५ वर्षांवरील ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक लस घेणारे बांधवांना व महिला भगिनींना दोन किलो तांदूळ, दोन किलो साखर देण्यात येत आहे. कारण लॉकडाउनची परिस्थिती असल्याने मजुरांच्या हाताला काम नाही म्हणून ही योजना राबविण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. यामागे शंभर टक्के लसीकरण एवढाच उद्देश आहे. मतदारसंघात कुणीही लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

९५ वर्षीय आजीचे लसीकरण

या वेळी ९५ वर्षीय व्यस्तीबाई गोरख ठाकरे यांनी आमदार श्री. पाडवी यांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधक पहिली लस घेतली. गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मणिलाल शेल्टे, तालुका गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, दिनेश खंडेलवाल, नांदेचे संरपच काशिराम मोरे, मालदा संरपच गोपी पावरा, रामपूर सरपंच नर्मदा पावरा, कुसुमवाडा सरपंच दिलीप पवार, सरकारी स्वीय सहाय्यक वीरसिंग पाडवी, आदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण दादा ठाकरे, प्रवीण वळवी, आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दंगल सोनवणे, दीपक ठाकरे, दिनेश कोराणे, ग्रामपंचायत सदस्य काशिराम मोरे, मनोज बागूल, अविनाश सामुद्रे, ग्रामसेवक किशोर वळवी, सोनू वळवी, हेमराज पवार, विक्की ठाकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Marathi Nandurbar News Coronavirus Vaccination In Aadivashi Aria Mla Rajesh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top