esakal | खून केला अन्‌ फोनवरून बेशुद्ध पडल्‍याचे कळविले

बोलून बातमी शोधा

murder case
खून केला अन्‌ फोनवरून बेशुद्ध पडल्‍याचे कळविले
sakal_logo
By
टिम इ सकाळ

तळोदा (नंदुरबार) : बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय मुलाच्या सोबत आलेल्या मुलाने दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना तलावडी (ता. तळोदा) येथे घडली. ऊसाचा शेतात बकऱ्या चरत असल्याने त्यांना हुसकावून लावण्यासाठी पाठविले असताना जाण्यास नकार दिल्याचा शुल्लक कारणावरून घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तलावडी गावातील गणेश प्रभु पाडवी हा अकरा वर्षीय मुलगा त्याच्याच गावातील विकास ठाकरे व शैलेश ठाकरे यांच्यासोबत रोझवा प्लॉट गावाकडे जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. यावेळी सदर घटना घडली.

फोन करून सांगितले की तो बेशुद्ध

विकास ठाकरे याने मोबाईल फोनद्वारे कळवले की गणेश पाडवी हा कोठार रस्त्यावर पिंपरीच्या झाडाखाली बेशुद्ध अवस्थेत पडला आहे. त्यावेळी गणेश यास घरी आणले असता तो बेशुद्ध होता. त्यास उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे घेऊन आले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून गणेश यास मृत घोषित केले. त्यामुळे विष्णू पाडवी यांनी गणेश हा मयत झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती.

गळ्यावर व्रण दिसल्‍याने शंका

मयत गणेशचे वडील प्रभू रामसिंग पाडवी यांनी मुलाच्या गळ्यावर दोरीचे व्रण सारखे दिसून आल्याने संशय व्यक्त केला होता. त्यानुसार विकास ठाकरे याने गणेश यास बकऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी पाठवले असता त्याने नकार दिला व मागील भांडणांचे कारणावरुन मनात राग धरला. रोझवा प्लॉटकडे उसाच्या शेतात पिंपरीच्या झाडाजवळ गणेश यास दोरीने गळा आवळून ठार मारल्याची फिर्याद प्रभू पाडवी यांनी दिली आहे. तळोदा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेत संशयित आरोपी विकास ठाकरे यांस अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे अधिक तपास करीत आहेत.