esakal | शंभरची नवी नोट नको जुनी हवीय..असे सांगताच गल्‍ल्‍यात हात घालत चोरीचा प्रयत्‍न

बोलून बातमी शोधा

robbery}

दोघा भामट्यांनी मोटरसायकलचा इसका देत लोकांच्या नजरा चुकवत पोबारा केला. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा चोरीचा थरार घडला असून पोलीस पाटील गजेंद्र गोसावी यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.

शंभरची नवी नोट नको जुनी हवीय..असे सांगताच गल्‍ल्‍यात हात घालत चोरीचा प्रयत्‍न
sakal_logo
By
संजय मिस्‍त्री

वडाळी (नंदुरबार) : ओमपान, ताबीज खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन भामट्यांनी भरदुपारी वडाळी (ता. शहादा) येथील आशापुरी ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात प्रवेश करून थेट गल्ल्यातून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाच्या सतर्कतेने व दुकान मालकाने आरडाओरडा करत चोरट्यांचा पाठलाग केला. दोघा भामट्यांनी मोटरसायकलचा इसका देत लोकांच्या नजरा चुकवत पोबारा केला. आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा चोरीचा थरार घडला असून पोलीस पाटील गजेंद्र गोसावी यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.
आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोन अनोळखी व्यक्‍ती वडाळी हिंदी मिश्रित भाषा बोलत असणाऱ्यांनी दोन जणांवर एका दुकानातून बॅग बांधण्यासाठी दोरी खरेदी केली. त्यावेळी दुकानदाराने त्यांना याबाबत विचारपूस केली. परंतु त्यांची भाषा समजत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी येथील आशापुरी ज्वेलर्स दुकानात मुलगा गल्ल्यावर बसल्याचे पाहून आम्हाला ओमपान- ताबीज खरेदी करायचे असल्‍याचे सांगितले. मुलाने त्यांना ओम पान व ताईत दिला. त्यावेळी त्यांनी 500 रुपयाची नोट दिली. उर्वरित तीनशे रुपये त्यांना परत केले. 

गल्‍ला उघडताच घातला हात
आम्हाला शंभरची नवी नोट नको, जुनी नोट हवी असे सांगितले. दुकानदाराने गल्ला उघडत त्यातून शंभरची जुनी नोट दिली. त्यावेळी या दोघा जणांनी थेट गल्‍ल्‍यात हात घालून त्याठिकाणी असलेले नोटांचे बंडल काढले. गल्ल्यातून चोरी करत असल्याचे मुलाचे निदर्शनास आल्याने त्यांनी वडील प्रकाश सोनार यांना आरोळी मारून दुकानात येण्याचे सांगितले. मात्र दोघा भामट्यांनी पकडले जाऊ या भीतीने तेथून पळ काढला. दुकान मालक व मुलगा त्यांना पकडल्यावर दोघांनी मोटरसायकलवर बसत दोघांना दूरपर्यंत फरफटत नेले. या वेळी दोघांनी चोर चोर असे आरोळ्या मारत पकडण्यासाठी धावले. मात्र जोराचा हिसका देत लोकांच्या नजरा चुकवत मोटरसायकलचा वेगवाढून दोघेजण पसार झाले.

दिड महिन्यात दुसऱ्यांदा घटना
आठ फेब्रुवारीला वडाळी येथे अलंकार ज्वेलर्सचे सेटर उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी कोंढवड येथे आठ लाख रुपयांची चोरी झाली. यात चोरीचा उलगडा होत नाही, तोच भर दिवसा गल्ल्यातून रोकड लंपास करण्याचा प्रयत्न झाला. यामुळे चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले आहे. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ हवालदार धनसिंग राजपूत विजय गावित स्थानिक गुन्हा अन्वेषण चे किरण मोरे उदय ओगले यांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज यासह परिसराची तपासणी माहिती घेतली.

संपादन ः राजेश सोनवणे