esakal | नंदुरबारला दोन गटांत हाणामारी ; पाच जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

two gat fight

नंदुरबारला दोन गटांत हाणामारी ; पाच जखमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नंदुरबार : शहरातील चिराग गल्ली परिसरात जमावबंदी व कोविड-१९ ची संचारबंदी सुरू असताना मशिदीजवळ गर्दी करू नये, असे सांगितल्याचा राग येऊन दोन गटांत तुफान हाणामारी झाली. त्यात दोन्ही गटांचे पाच जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांकडून वेगवेगळी कारणे दाखवित परस्परांविरूध्द शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही गटांतील २१ जणांविरूध्द गुन्हे दाखल होऊन दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमी पाचही जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी (ता.८) दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली. (crime news nandurbar clash in two groups Five injured)

शहरातील चिराग गल्लीतील मशिदीजवळ पाच जणांना परवानगी असताना काही जणांनी नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे मो. अबिद शेख जैनोद्दीन यांनी त्या मंडळीला गर्दी करण्यास मनाई केली. त्याचा राग येऊन फरीद शेख गुलाम रसुलसह १२ जणांनी हॉकीस्टीक, लोखंडी रॉड, काठ्या घेऊन अबिद शेख जैनोद्दीन यांच्यासह कुटुंबियांवर हल्ला केला. त्‍यात गंभीर दुखापत होऊन अबिद शेख जैनोद्दीन व शेख रिफ शेख जैनोद्दीन हे दोन्ही पिता पुत्र जखमी झाले. याबाबत अबद शेख जैनोद्दीन याने नंदुरबार शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरून १२ जणांवर गुन्हा दाखल झाला. त्यातील दोघांना अटक झाली आहे.

मशिदीत जाऊ देण्यास मनाई

तसेच दुसऱ्या गटातर्फे फरीद शेख गुलाम रसुल यांच्या फिर्यादीत मशिद ट्रस्टचे घरभाडे बाकी असल्याच्या कारणावरून व नमाज पठणासाठी मशिदीत जाऊ देण्यास मनाई केल्याच्या कारणावरून मो. अबिद शेख जैनोद्दीन व इतर नऊ जणांनी लाठ्या -काठ्या, लोखंडी रॉड घेऊन घरात घुसून मारहाण केली. त्यात सलीम फरीद शेख रसुल, साहिल फरीद शेख रसुल व फरीद फरीद शेख रसुल हे तिघेजण जखमी झाल्याचे म्हटले आहे. जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.