esakal | शहाद्यात माथेफिरूचे कृत्‍य; गायींना जखमी करण्याचे अजब सत्र 
sakal

बोलून बातमी शोधा

cow

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पाठीवर, पायावर, पोटावर कोयत्या सारख्या शस्त्राने खोल घाव घातलेला दिसून आला. हे कृत्य कोणी कशासाठी केले? याचा संदर्भ लागला नाही.

शहाद्यात माथेफिरूचे कृत्‍य; गायींना जखमी करण्याचे अजब सत्र 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुरुषोत्तमनगर (नंदुरबार) ः शहादा शहरात रस्त्यावरील गायींवर रात्री कोयत्याने अथवा सुऱ्याने गंभीर वार करायचा व खोल जखम करून तिला मरणासन्न स्थितीत सोडायचे, असा अघोरी प्रकार काही दिवसापासून घडत आहे. यामुळे आतापर्यंत दहा-बारा गायी जखमी झाल्या असून हा निर्दयी प्रकार घडवणाऱ्या माथेफिरूला ताबडतोब अटक करावी; अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. 
शहादा शहरात गुरुवारी पोटावर, पाठीवर सहा इंचाच्या, पाऊण फूट लांबीच्या खोल जखमा झालेल्या गायी आढळून आल्या. एक दोन नव्हे, तर पाच ते सहा गाई अशा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पाठीवर, पायावर, पोटावर कोयत्या सारख्या शस्त्राने खोल घाव घातलेला दिसून आला. हे कृत्य कोणी कशासाठी केले? याचा संदर्भ लागला नाही. परंतु संकल्प ग्रुपच्या व गोप्रेमींनी व्यक्तींनी ताबडतोब दखल घेऊन त्यांच्यावर उपचार केले. 

आजही घडला प्रकार
शुक्रवारी पुन्हा असाच प्रकार घडलेला आढळला. आणखी पाच ते सहा गाई रक्तबंबाळ झालेल्या आढळून आल्या. यांच्याही पोटावर खांद्यावर पायावर कोयत्या सारख्या शस्त्राने वार केलेला दिसून आला. हा निर्दयी प्रकार रात्रीच्या अंधारात छुपेपणाने केला जात आहे. विशेष असे की गायीच्या शरीरातील रक्त काही तास वाहत राहून ती मरणासन्न अवस्थेत जावी, अशा दृष्ट पद्धतीने कुणी माथेफिरु हे हल्ले करीत आहे. यामुळे जनमानसात प्रचंड संतप्त भावना उमटू लागल्या आहेत. सीसीटीव्हीची मदत घेऊन वेळीच या षडयंत्राचा तपास लावणे आवश्यक बनले आहे. पोलिस विभागाने व प्रशासनाने ताबडतोब या प्रकाराची दखल घ्यावी; अशी मागणी गोरक्षकांनी केली आहे.