
नंदुरबारला बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त
नंदुरबार : शहरातील रामदास व्यायमशाळेजवळ एका घरात दुसऱ्या मजल्यावर स्पिरीटपासून देशी-विदेशी (Wine) दारू बनवून विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (police raid) मंगळवारी (ता. ११) तेथे धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी ५६ हजारांच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले आहे. (nandurbar police raid in counterfeit liquor factory demolished)
हेही वाचा: लसीकरण ऑनलाइन नोंदणीत घोळ
संबंधित घराच्या दुसऱ्या मजल्यावर दोन जण स्पिरीटपासून देशी-विदेशी दारू बनवून विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली होती. त्या आधारे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. राजपूत यांच्या पथकाने सकाळी दहाच्या सुमारास सापळा रचला.
भरलेल्या बाटल्या
एका खोलीत दोन जण प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये द्रव पदार्थ टाकून ते हलविताना दिसले. तसेच दारूच्या रिकाम्या व भरलेल्या बाटल्याही आढळल्या. त्यामुळे पथकाने शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. शैलेश भगवान चौधरी (वय ४३) व सुनील काशीनाथ चौधरी (दोघे रा. रूपाशेठ पार्क, नंदुरबार) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एकुकूण ५५ हजार ९१२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Marathi Nandurbar News Nandurbar Police Raid In Counterfeit Liquor Factory
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..