esakal | खापरखेडा प्रकल्प कोरडा पडल्याने शेतकरी चिंतेत 

बोलून बातमी शोधा

khaparkheda project}

लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून धरण दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे. येथील धरणाचे बांधकाम १९७२ च्या काळात दगड-मातीत करण्यात आले.

खापरखेडा प्रकल्प कोरडा पडल्याने शेतकरी चिंतेत 
sakal_logo
By
संजय मिस्‍त्री

वडाळी (नंदुरबार) : बारमाही पाणीसाठा असलेल्या खापरखेडा (ता. शहादा) येथील लघुप्रकल्पाच्या नादुरुस्त विहीर व भूकंपाच्या धक्क्याने पूर्ण जलसाठा वाहून गेला. पन्नास वर्षांत प्रथमच कोरड्या पडलेल्या प्रकल्पात साचलेला गाळ काढण्यासाठी आर्थिक तरतूद नसल्याने या वर्षीच्या हंगामातही शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. 
लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून धरण दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे. येथील धरणाचे बांधकाम १९७२ च्या काळात दगड-मातीत करण्यात आले. या धोरणामुळे कोंडावळ, वडाळी, जयनगर आदी गावांतील ६०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. प्रायोगिक तत्त्वावर परिसरातील शेतकऱ्यांना याचा खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात फायदा होऊ लागला. त्याचबरोबर विहीर, कूपनलिका यांच्या पातळीतही वाढ झाली. शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न कमी झाला. मात्र दर वर्षीच्या पावसाळा वातावरणातील बदलांमुळे या धरणात पाण्यापेक्षा गाळाचे प्रमाण वाढले. त्यातून जलसाठा कमी होऊ लागल्याने सिंचनाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यातच दोन वर्षांपासून ऐन रब्बी हंगामात नादुरुस्त विहिरीमुळे जलसाठा वाहून जात असल्याने शेतकऱ्यांसाठी पाणीटंचाई सुरू झाली आहे. 

सिंचन-पशुधनाचे हाल 
दोन महिन्यांपूर्वीच्या भूकंपाने या धरणातील साठा वाहून धरण कोरडेठाक झाले. उन्हाळ्यात जनावरांना जंगलातील प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही. शेतकरी व पाणीवापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या धरणाच्या दुरुस्ती व गाळ काढण्यासाठी संबधितांना निवेदनाद्वारे समस्या मांडल्या. मात्र या समस्यांचे निराकरण झाले नाही. आमदार विजयकुमार गावित यांनी पाहणी दौऱ्याप्रसंगी पाच ते सहा वेळा या धरणाला भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या. धरण दुरुस्तीचा अहवाल संबंधित विभागाला तयार करण्याच्या सूचना केल्या. मात्र संबंधित विभागाकडून या धरणाच्या कायमस्वरूपी दुरुस्ती अथवा नव्याने बांधकामासाठी कुठल्याच प्रकारची तरतूद होत नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. 

धरणाच्या झालेला अवस्थेबद्दल संबंधित पाटबंधारे विभाग व लोकप्रतिनिधी यांना निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र अद्याप धरणाच्या दुरुस्तीसाठी कुठल्याच प्रकारच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून दिसून येत नाहीत. 
- लालचंद माळी, अध्यक्ष, शिवकृपा पाणीवापर संस्था, कोंढावळ 

संपादन ः राजेश सोनवणे