esakal | कांद्याच्या भावात घसरण; शेतकरी हवालदिल
sakal

बोलून बातमी शोधा

onion

मुबलक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पांढरा कांद्याचे लागवड जास्‍त केली होती. यापूर्वी कापूस, पपई या पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले.

कांद्याच्या भावात घसरण; शेतकरी हवालदिल

sakal_logo
By
संजय मिस्‍त्री

वडाळी (नंदुरबार) : पेट्रोल- डिझेल व खाद्यतेलाच्या वाढत्या भावात १७ ते १८ रुपये किलो दराने विकला जाणारा पांढरा कांद्याचे दर निम्म्यावर आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या भावात कांद्याची होणारी घसरण शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब निर्माण झाली आहे. या भावातून विक्री केल्यास गुंतवलेले भांडवल देखील निघणे मुश्कील झाले असून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. 

यंदा मुबलक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पांढरा कांद्याचे लागवड जास्‍त केली होती. यापूर्वी कापूस, पपई या पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यातच या कांद्याची लागवड ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होत असल्याने शेतकऱ्यांनी दोन हजार रुपये किलो भावाने बियाणे खरेदी करून त्याची रोपे तयार करत एकरी पंधरा हजार रुपये खर्च येणाऱ्या या पिकाची लागवड केली. या कांद्याची लागवड कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यात देखील केली जाते. 

सुरवातीला १८ प्रतिकिलो रूपये भाव
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ठरावीक ठिकाणी पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. या कांद्याला आयुर्वेदात महत्त्व असल्याने यावर प्रक्रिया करून चिप्स पावडर पेस्ट तयार करून ती विदेशात पाठवली जाते. यापूर्वी लाल कांद्याचे अवकाळी पावसाने बारा वाजले होते, त्यात पांढऱ्या कांद्याला मोठी मागणी निर्माण होईल, या आशेवर ती शेतकऱ्यांनी उन्हाळी पांढरा कांद्याची लागवड केली. साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यात निघणारे या कांद्याला सुरुवातीच्या काळात १७ ते १८ प्रति किलो रुपयांनी व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केली. अपेक्षित भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी काढण्यास सुरुवात केली. आठवडाभराच्‍या आतच या कांद्याच्या भावात घसरण होऊन ती निम्म्यावर आली. एकरातून साधारण आठ ते नऊ टन उत्पन्न अपेक्षित होते, मात्र त्यांच्यातही उत्पादनात घट होऊन भावात घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. 

अपेक्षीत भाव नसल्याने नाराजी 
पांढऱ्या कांद्याची लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च एकरी ३० हजार येतो. सुरुवातीला अपेक्षित भाव होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून भावात घसरण झाल्याने व्यापारी सहा ते सात रुपये किलो प्रमाणे मागणी करीत टाकलेले भांडवल व उत्पादित झालेला मालाला त्य मिळणारा भाव याचे गणित जुळत नसल्याचे कांदा उत्‍पादक शेतकरी विश्वास पाटील व राकेश धनगर यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image