राजकारणातील कट्टर विरोधक माजी आमदार मदतीला 

chandrakant raghuvanshi shirish choudhary
chandrakant raghuvanshi shirish choudhary

नंदुरबार : राजकारण कितीही शह-काटशहाचे असू द्या, मात्र संकटकाळी त्याचा बाऊ न करता जनसेवेसाठी जे धावतात तेच खरे लोकनेते ठरतात. याचा प्रत्यय सध्या नंदुरबारमध्ये माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योगपती डॉ. रवींद्र चौधरी यांनी कोरोना रुग्णांसाठी सुरू असलेल्या धडपडीतून दाखवून दिले आहे. त्या मुळे या तिन्ही नेत्यांच्याच नावांची चर्चा जिल्ह्यातच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यांमध्येही सोशल मीडियावर सुरू आहे. 
नंदुरबार म्हटले म्हणजे येथील राजकारणच वेगळे. निवडणूक आली, की येथील राजकीय विरोध टोकाला जातो, हेही तेवढेच खरे. मात्र संकट काळात श्रेयाचे राजकारण येथे कधीच झाले नाही. एखादा मुद्दा अपवाद वगळता येथील स्थानिक नेते आपापल्या पद्धतीने जनसेवेला अहोरात्र सज्ज असतात. जिल्ह्यात इतर लोकप्रतिनिधी मदत करो ना करो, मात्र नंदुरबारकरांच्या संकटात पहिल्यापासूनच सी. बी. ग्रुप व हिरा ग्रुप सदैव तत्पर असतात. काही वेळा राजकीय स्वार्थासाठी का असेना, मात्र जनतेला हे दोन्ही ग्रुप कधीही वाऱ्यावर सोडत नाही किंवा पक्षभेद करीत नाहीत, अशी भावना खुद्द नंदुरबारकरांनी व्यक्त केल्या आहेत. 

राजकारणात कट्टर विरोधक
दोन्ही गट नंदुरबारच्या राजकारणात कट्टर विरोधक मानले जातात. मात्र सध्याच्या कोरोना संकटात या दोन्ही ग्रुपचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योगपती डॉ. रवींद्र चौधरी यांनी कधीही श्रेयाचे राजकारण या वर्षभरात केले नाही. शासनाची मदत नाही, प्रशासनाकडून अपेक्षा न ठेवता गेल्या वर्षभरापासून हे नेते पदरमोड करून नंदुरबारकरांना कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या दोन्ही गटांच्या नेत्यांना सर्वसामान्य माणूस सरळ केव्हाही भेटतात. आपली अडचण मांडतात व ती सुटते. 

रेमडेसिव्हिर दिले अत्यल्‍प दरात
कोरोनाने गेल्या १४ महिन्यांपासून थैमान घातले आहे. तेव्हापासून माजी आमदार रघुवंशी व चौधरी, तसेच डॉ. चौधरी यांनी स्वखर्चातून जनसेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानंतर रुग्णालयातील उपचार व त्यासाठीचा खर्चासाठीही आवश्यक ती मदत करताहेत. एवढेच नव्हे, तर सध्याचा परिस्थितीत कोरोना रुग्णांसाठी गरजेचे समजले जाणारे रेमडेसिव्हिर इंजेक्शन या दोन्ही गटाने अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले आहेत. जे काम जिल्ह्यातील कार्यरत लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे होते ते काम हे दोन्ही माजी आमदार व उद्योगपती डॉ. चौधरी करीत आहेत. हा उपक्रम महारष्ट्रात नंदुबारमध्येच कदाचित राबविला असावा. त्यामुळे लगतच्या जिल्ह्यामधील कोरोना रुग्णही नंदुरबार शहरात येऊन या लोकनेत्यांकडून इंजेक्शन उपलब्ध करून घेत आहेत. त्यांनासुद्धा ते दिले जात आहे. त्यामुळे दोन्ही माजी आमदारांचे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे. ते केवळ त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळेच. 

संपादन- राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com