esakal | स्‍थलांतरीत मजूरांची वापसी; वस्‍त्‍या लागल्‍या गजबजू
sakal

बोलून बातमी शोधा

workers

रोजगारानिमित्त गुजरात राज्यात व सौराष्ट्रसह परराज्यात उदरनिर्वाहसाठी कुटूंबासह स्थलांतर करतात. यामुळे बहुतेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. शहादा तालुक्यातील बहुतेक कुटूंबे गेल्या पाच, सहा महिन्यांपासून स्थलांतरामुळे गाव- पाडे ओस पडले होते.

स्‍थलांतरीत मजूरांची वापसी; वस्‍त्‍या लागल्‍या गजबजू

sakal_logo
By
योगीराज ईशी

कळंबू (जळगाव) : पाच, सहा महिन्यापासून रोजगारानिमित्त विविध ठिकाणी स्थलांतर झालेले आदिवासी मजूर आता गावाकडे परतू लागले आहेत. यामुळे ओस पडलेली पाडे, वस्त्या आता पुन्हा गजबजू लागले आहेत.
दसरा, दिवाळीच्या दरम्‍यान ग्रामीण भागातील बहुतेक आदिवासी मजूर रोजगारानिमित्त गुजरात राज्यात व सौराष्ट्रसह परराज्यात उदरनिर्वाहसाठी कुटूंबासह स्थलांतर करतात. यामुळे बहुतेक मुले शिक्षणापासून वंचित राहतात. शहादा तालुक्यातील बहुतेक कुटूंबे गेल्या पाच, सहा महिन्यांपासून स्थलांतरामुळे गाव- पाडे ओस पडले होते. यामुळे स्थानिक व्यवसायिकांना याचा फटका सहन करावा लागला. परंतु गेल्या आठ, पंधरा दिवसांपासून स्थलांतरीत कुटूंबे गावाकडे येण्यास सुरुवात झाल्याने गावे, पाडे पुन्हा गजबजू लागल्याने स्थानिक व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 

विद्यार्थीही येणार शिक्षणाच्या प्रवाहात
नुकत्याच ग्रामीण भागातील जि. प. शाळा सुरू झाल्याने गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शिक्षणापासून दुरावलेल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळणार आहे. तसेच घरवापसी झालेली कुटुंबातील विद्यार्थी संख्या वाढीमुळे शाळेतील विद्यार्थी संख्याही वाढणार आहे. तर दुसरीकडे धडगाव तालुक्यातील बहुतांश मजूरवर्ग शहादा, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील विविध गावांत रोजगारानिमित्त स्थायी झाले आहेत. 

शेत मजुरांचा प्रश्‍नही सुटणार
सध्या गहू, हरभरा, दादर कापणीचा हंगाम जोरावर सुरू असून स्थानिक शेतकऱ्यांना ऐन वेळेस मजूर उपलब्ध होत नसल्याने मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत होती. परंतु धडगाव तालुक्यातील बहुतेक पाड्यातील मजूर वर्ग गावाकडे स्थायी झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांना वेळेवर मजूर मिळून पीक काढणीही वेळेवर होते. तर शेती मालाला भाव ही योग्य मिळतो. म्हणून सध्या तरी शेतकऱ्यांना मजूर मिळवण्यासाठी कसरत कमी प्रमाणात करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे