esakal | कारवाईचा सलग तिसरा दिवस; दुकानदारांकडून नियम धाब्‍यावर
sakal

बोलून बातमी शोधा

shahada palika

कारवाईचा सलग तिसरा दिवस; दुकानदारांकडून नियम धाब्‍यावर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शहादा (नंदुरबार) : कोविड १९ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिस व पालिका प्रशासनाच्या (Shahada palika) संयुक्त पथकाने बुधवारी (ता. ५) सलग तिसऱ्या दिवशी धडक मोहीम राबवत सात दुकानांवर कारवाई करीत दंड वसूल केला. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता नियम (Lockdown rules) धाब्यावर बसवून व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. (shahada palika continue action shop in no rules follow)

विनापरवानगी असलेली शहरातील काही कापड व ज्वेलरीचे दुकाने सुरू असल्याने कारवाई करण्यात आली. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ व शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी पथकासमवेत सकाळपासूनच मुख्य बाजार पेठ, तूप बाजार परिसर, खेतिया रोड व दोडाईचा रोड आवारात पाहणी केली असता, नियमांचे उल्लंघन करून सात दुकाने सुरू असल्याचे आढळल्याने त्यांच्याकडून दंड वसूल केला. तसेच गर्दीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी चार रस्ता परिसरातील सात दुकानांना नोटीस बजावत सील करून दंड ठोठावला. तर विनामास्क फिरणाऱ्या तीन नागरिकांना प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोठावला.

हेही वाचा: आमच्‍यासाठी सर्व रूग्‍ण मायबाप; डॉक्‍टरांचे भावनिक आवाहन

दहा लॉरीधारकांवरही कारवाई

भाजी विक्रेत्यांनी मुख्य बाजारात गर्दी करू नये, खुल्या जागेवर व्यवसाय करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहा लॉरीधारकांवर पथकाने कारवाई केली. यावेळी पुन्हा आढळल्यास फौजदारी कारवाईचे सूतोवाचही प्रशासनाने केले. यावेळी पथकात पोलिस उपनिरीक्षक नीलेश वाघ व उपनिरीक्षक महाजन यांसह नगर परिषदेतील भरारी पथक कार्यालय पर्यवेक्षक माधव गाजरे, अभियंता संदीप टेंभेकर, स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, सचिन महाडिक, दिलीप कोळी, चेतन गांगुर्डे, गोटूलाल तावडे, भिकाजी साळी, यशवंत भारुडे, विनोद ठाकरे, वसिम शेख, ब्रिजलाल पाटील, समीर शेख, सागर साळुंके, तसेच पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

loading image
go to top