
गेल्या महिन्यात एका ट्रक चालकाच्या तोल गेल्यामुळे ट्रकने मंदिराला धडक दिली होती. त्यात मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वाहन गेल्यामुळे पिलर व मंदिराच्या सर्व सुशोभित भाग नेस्तनाबूत झाला .
शहादा (नंदुरबार) : प्रकाशाकडून शहाद्याकडे येणाऱ्या वाहनाने लांबोळा गावाजवळ पुढे चालत असलेल्या चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. त्यात वाहनचालकाच्या तोल गेल्यामुळे गाडी रस्त्याला लागून असलेल्या दोन फुटी गटारी वरून विष्णू भगवान मंदिराच्या चौथऱ्याजवळ येऊन थांबली. ही घटना आज (ता.21) सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
गेल्या महिन्यात एका ट्रक चालकाच्या तोल गेल्यामुळे ट्रकने मंदिराला धडक दिली होती. त्यात मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात वाहन गेल्यामुळे पिलर व मंदिराच्या सर्व सुशोभित भाग नेस्तनाबूत झाला . मंदिराच्या गाभारा मात्र जसाच्या तसा उभा राहिलेला होता.घटनेला महिना होत नाही तोच (ता.21) सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान प्रकाशाकडून चोपडाकडे जाणाऱ्या (एम. एच.39, 2170) फिगो या चारचाकी गाडीत आपल्या कुटुंबासह चालक जात असताना लांबोळा गावालगत मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे वाहन रस्त्याला लागून असलेल्या गटारीच्या दोन फूट उंचीवरून मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन ठेपली. यात मंदिराच्या नुकसान झालेले नसले तरी वाहनाच्या नुकसान झाले. वाहनातील एकाही प्रवासाला मोठी इजा पोहोचली नसली; तरी चालकाच्या हाताला किरकोळ जखम झाली आहे. वाहनाला धडक मारून पोबारा होऊन पहाणाऱ्या चालकाला मनरद गावालगत नागरिकांनी अडवून प्रकाशा दूर क्षेत्राच्या पोलिसांच्या स्वाधीन केले.
संरक्षण कठडे व्हावे
प्रकाशा शहादा या रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असून करजई गावाच्या पुढे शहादा कडे येणारा रस्ता पूर्ण झाला असल्याने दुचाकी ,चारचाकी, जड वाहन चालक हे वेगाने वाहन हाकत असतात लांबोळा गावालगत सरंक्षण कठडे नसल्यामुळे व गावालगतच रस्ता असल्याने अपघातांना आमंत्रण देणारे ठरू पाहात आहे. ट्रक चालक बेधुंद वाहन चालवत असतात रोड रस्ते बांधकाम ठेकेदाराने गावालगत संरक्षण कठडे बांधणे अनिवार्य होते परंतु त्यांच्या चुकीमुळे भविष्यात मोठी घटना होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. हद्दीत गावालगत संरक्षण बांधण्याची मागणी होत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे