esakal | घरी जाण्यासाठी बसच्या प्रतिक्षेत होते उभे; भरधाव ट्रक आली अन्‌ क्षणात सारे संपले

बोलून बातमी शोधा

accident}

कुकावल येथे लग्न समारंभानिमित्त अमृत प्रभाकर भदाणे व शीतल अमृत भदाणे (रा. हातनूर ह.मु.सुरत) हे दोघे जण रविवारी (२८ फेब्रुवारी) आले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर सुरत जाण्यासाठी निघत असताना

घरी जाण्यासाठी बसच्या प्रतिक्षेत होते उभे; भरधाव ट्रक आली अन्‌ क्षणात सारे संपले
sakal_logo
By
योगिराज ईशी

कळंबू (नंदुरबार) : शहादा तालुक्यातील कुकावल येथील माहेर असलेली विवाहिता सासरी परतत असताना शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभे असतांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने घडलेल्या अपघातात विवाहिता जागीच ठार झाली. तर पतीला दुखापत झाली आहे. 
कुकावल येथे लग्न समारंभानिमित्त अमृत प्रभाकर भदाणे व शीतल अमृत भदाणे (रा. हातनूर ह.मु.सुरत) हे दोघे जण रविवारी (२८ फेब्रुवारी) आले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर सुरत जाण्यासाठी निघत असताना दशरथ पाटील व युवराज पाटील या दोघाजणांनी मुलगी व जावयांना निमगूळ येथे सोडले. 

हसत निरोप देण्यासाठी वडील अन्‌..
वाहनाची वाट पाहत असताना रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव वेगातील ट्रक (एम.एच.४३ बीजी ७१५२) याने शीतल भदाणे व अमृत भदाणे यांना धडक दिली. घडलेल्या अपघातात शीतल भदाणे यांना गंभीर दुखापत झाली. दोघांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णवाहिकेने दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीअंती शीतल भदाणे यांना मृत घोषित केले. याबाबत दशरथ गिरधर पाटील (रा.कुकावल ता.शहादा) यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेवटची भेट
लग्‍नानिमित्‍ताने माहेरी आलेल्‍या शीतल भदाणे यांनी माहेरच्या मंडळींची घेतलेली भेट शेवटची ठरली. सर्वांनी गप्पा आणि भेटीगाठी झाल्‍याानंतर आनंदाने घरी परतत असतात शीतल यांच्यावर घातलेला घाला; हा माहेरच्या मंडळींना न पटणारा होता.

संपादन ः राजेश सोनवणे