esakal | अभिनंदनच्या परिवाराला गरज माणुसकीची....!
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

अभिनंदनच्या परिवाराला गरज माणुसकीची....!

sakal_logo
By
विजयकुमार इंगळे- सकाळ वृत्तसेवा

नाशिकः चार महिन्यांच्या चिमुरड्या अभिनंदनचे काय चुकले? अभिनंदन दोन महिन्यांचा असताना आई देवाघरी गेली... आयुष्याच्या मावळतीकडे झुकलेल्या आजी-आजोबांना आजाराने ग्रासलेय... वडील राकेश नेरकर नाशिकमध्ये हंगामी नोकरी करताहेत... चिमुरड्या अभिनंदनसोबत चार वर्षांची बहीण नंदिनी... पुढे काय? तिलाही माहिती नाही... पिकलं पान कधीही गळून पडण्याची आजी-आजोबांना चिंता... घरात एकवेळ खायची भ्रांत... मात्र चार महिन्यांच्या चिमुरड्या अभिनंदनला केवळ जन्माला आलो, एवढेच माहिती... गोंडस चेहऱ्यामागे लपलेले वास्तव...! 
   

नेरकर कुटुंब मूळचे झोडगे येथील... नेरकर परिवाराची आर्थिक परिस्थिती बेताचीच... एकवेळ खायची भ्रांत... मात्र कुटुंबासाठी लढण्याची जिद्द असलेले राकेश नेरकर यांनी काही वर्षांपूर्वी थेट नाशिक गाठले... मालेगाव तालुक्‍यातील हे नेरकर कुटुंब... पती राकेश, पत्नी रेखाबाई, आई पुष्पाबाई, वडील रमेश आणि चार वर्षांची मुलगी तसेच नुकताच चार महिन्यांपूर्वी कुटुंबात दाखल झालेला चिमुरडा अभिनंदन. नियतीने या परिवाराच्या नशिबात वेगळेच लिहून ठेवले असावे... हातावर पोट असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला तो चिमुरड्याच्या जन्मानंतर आई रेखाबाई देवाघरी गेल्यावर... कारणही हादरवून सोडणारे... आईला दिवस गेल्यानंतर आठव्या महिन्यात तपासणीत आईला टीबी झाल्याचे निदान झाले...
    '

कुटुंब हादरले... बाळंतपण थांबवणे शक्‍य नव्हते... गरिबी पाचवीलाच पुजलेल्या या कुटुंबावर झालेला मोठा आघात होता... त्याही परिस्थितीत डॉक्‍टरांनी सुखरूप बाळंतपण केले, मात्र गोंडस बाळाला जन्म देऊन दोन महिन्यांत बाळाचे मातृछत्र हरपले... केवळ जन्माला आला, पुढे काय? याचा लवलेशही चिमुरड्या अभिनंदनला नाही... पुढे काय, हा एकच प्रश्‍न सोबत घेऊन कुटुंब विचारात बुडालेय... 
   

कोणताही मार्ग दिसेना... पिकलेले पान गळून पडल्यानंतर नव्याने पालवी म्हणून कुटुंबात रुजू पाहणाऱ्या दोन्ही चिमुरड्या नंदिनी आणि अभिनंदनचे पुढे काय, हा एकच अनुत्तरित प्रश्‍न उपस्थित होतोय...! नाशिकमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या कुटुंबावर आलेला हा प्रसंग काळीज पिळवटून टाकणारा आहे..! गरज आहे त्यांना मदतीची... आणि ती देण्यासाठी सर्वांनी पुढे आलेच पाहिजे... 
 

loading image
go to top