रजवाडी होळीने राखली अनोखी परंपरा

holi
holi
Updated on

काठी (अक्कलकुवा) ः सातपुड्यातील राजघराण्याची परंपरा असलेली येथील होळी आज सकाळी सहाला पेटविण्यात आली आणि गेल्या बारा तासापासून अव्याहतपेणे होळीभोवती नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. काठी संस्थानिकांचे वारसदार  महेंद्रसिंग पाडवी यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. आदिवासी विकासमंत्री अॅड. के.सी. पाडवी, आमदार डाॅ. विजयकुमारगावित यांनी उपस्थित राहत आदिवासी बांधवांचा उत्साह द्वगुणित केला. दरम्यान येथीलहोळीचे अनोखे वैशिष्ट म्हणजडे सलग बार ातास न थकता आदिवासी पुरूष वेगवेगळा पेहराव करीत ढोलच्यातावार एकाच ताल आणि सुरात नृत्य करीत होते. संपूर्ण रात्रभर यामुळे काठी गावाला यात्रेचे स्वरूपआले होते.


काठी येथील होळीला अनेक वर्षांची पंरपरा आहे. येथील संस्थानिकांपासून ही होळी आदिवासी बांधवांसाठी एक आनंददायी उत्सव ठरला आहे, ती पंरपरा जपत आजही त्याच पध्दतीने हा उत्सव साजरा होता. काठी ग्रामपंचायतीच्या चौकात जिल्हा परिषद सदस्य सी.के. पाडवी यांच्या पुढाकाराने होळीची जय्यत तयारी करण्यात आली होती. संपूर्ण परिसराची स्वच्छता करीत खास मंडप उभारण्यात आला होता. सायंकाळी सहाला मानाच्या होळीची काठीच्या पूजनाने या यउत्सवाला सुरवात झाली. लगतच्या गावपाड्यायवरील महिला पुरूश तसेच होळीसाठी खास पेहरावकेलेले आदिवासी युवक ढोलच्या तालावरनृत्य करीत दाखल होत होते. रात्री दहाला परिसारात पाय ठेवायलाही जागा राहिली नव्हती. एवढी मोठी गर्दी असूनही कुठलाही अनुचित प्रकार न घडता आदिवासी बांधव नृत्याच्या तावार ठके धरत होते.

सलग बारा तास न थकता नृत्य
काठी आणि परिसरातून आलेलेे आदिवासी युवक आणि तरूणांनी वेगवेगळा पेहराव केलेला होता. यात रंगीबंरीग झिरमिऱ्यांचा तसेच मोरपिसांच्या पंखांचा टोप लक्षवेधी होता. अनेकांनी खास तुंबड्यां कमरेला बांधलेल्या होत्या.चेहऱ्यावर रंगीबेरंगी चित्र,नक्षी चितारलेली होती. हे पुरूष आणि युवक ढोलच्या तालावर नृत्य करीत होते. एकच ताल आणि लयीवर सुरू झालेले हे नृत्य न थकात सलग बारा तास सुरू होते. सायंकाळी सहाला सुरू झालेली हे नृत्य पहाटे पावणेसहाला होळीचा खांब घटनास्थली आल्यानंतरही सुरू होते. होळीची विधीवत पूजा करण्यात आल्यानंतर ती पेटविण्यात आली.

होळी,नृत्याचे थेट प्रेक्षेपण
जिल्हा परिषद सदस्य सी,.के,पाडवी यांच्या पुढाकाराने यंदाही एलईडी स्कीन लावण्यात आले होते. त्यामुळे चौकाव्यतिरिक्त जवळच्या टेकडी व लगतच्या परिसरात बसलेल्या आदिवासी बांधवांना होळी आणि आदिवासींच्या नृत्याचे थेटआनंद घेता आला.या स्कीनवर दाखविण्यात येणाऱ्या थेट प्रेक्षपणाने गर्दी न होता उत्सव शांतते त साजरा कऱण्यात आला. या उत्सवासाठी मुंबई तसेच पुण्याहून अनेक नागरिक तसेच छायाचित्रकार आले होते.

असा असतो ढोल
आदिवासी बांधव होळीच्या नृत्यासाठी वापरत असलेला ढोल हा संपूर्ण लाकडी असतो. तो एकाच झाडाच्या बुधापासून तयार करण्यात आलेला असतो, त्याचे वजन किमान अठरा ते पंचविस किलोपर्यत असतो. त्याला दोर बांधून सलग बारा ते तेरा तास गळ्यात बांधून तो वाजविणे म्हणजे एक दिव्यच असते, ताल आणि सूर बिघडू  न देता  हा ढोल वाजविणे ही मोठी कसरत असते असे बिजऱ्या पाडवी याने सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com