शिक्षेत सुट मिळविणाऱ्यांनाच भाजप वीर म्हणतात : योगेंद्र यादव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

अमळनेर : ज्यांचा घराण्यातील कोणत्याही नागरिकांनी स्वातंत्र लढ्यात सहभाग घेतला नाही. ज्यांनी सहभाग घेतला ते अंदमानच्या तुरुंगात असतांना सहा- सहा पत्र लिहून इंग्रजांकडून माफी मागून शिक्षा सूट करण्याच्या विनवण्या करीत होते; त्यांनाच भाजपा वीर म्हणत असल्याची टीका योगेंद्र यादव यांनी कोणाचेही नाव न घेता केली. 

अमळनेर येथील शिवाजी महाराज नाट्यगृहात लोकशाही बचाव नागरी कृती समितीतर्फे सभा आयोजित केली आहे. भारत- संविधान- लोकशाही ह्या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,आमदार अनिल पाटील,माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील लोकसंघर्ष मोर्चा च्या नेत्या प्रतिभा शिंदे आदि उपस्थित होते. अमळनेर येथील सभेला पोलीसांनी काही अटी व शर्तीवर परवानगी दिली. उमर खालीद मात्र सभेला येवू शकले नाहीत. प्रचंड पोलीस बंदोबस्तात सभा घेण्यात आली. 

मोदींना केवळ टोप्या दिसतात 
योगेंद्र यादव म्हणाले, की स्वामी विवेकानंद यांनी नागरिकांना देश व जात विचारू नका असे सांगितले होते. परंतु केंद्र सरकारने तोच कायदा तयार केला असून नागरिकांची जात व धर्म विचारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करतांना ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात कपड्यावरून नागरिक ओळखतो. परंतु मोदींना कपड्यांमध्ये फक्त टोप्या दिसतात. त्या कपड्यांमध्ये त्यांना तिरंगा दिसत नाही. मोदी आणि शहा यांनी दिल्लीच्या इंडिया गेटवर जाऊन त्याठिकाणी असलेल्या स्वातंत्र वीरांची नावे पहायला हवीत. ज्यांनी भारताला स्वातंत्र करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र शासनाने एनआरआर विरोधात जनजागृती करायला हवी; असे अवाहनही त्यांनी केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner CAA NRC yogendra yadav sabha lok sangharsh morcha