..अन लॉकडाऊन काळात घेतली ऑनलाइन मीटिंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने 16 मार्चपासून महाराष्ट्र शासन व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या आदेशानुसार महाविद्यालय बंद असून Work From Home चे आदेश देण्यात आले आहेत.

अमळनेर : येथील धनदाई महाविद्यालयातील IQAC विभागामार्फत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पहिली ऑनलाइन मीटिंग संपन्न झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या मिटिंगची  अध्यक्षता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी केली तर मिटिंगचे समनव्यक म्हणून IQAC विभागप्रमुख प्रा. लिलाधर पाटील यांनी  हे यशस्वी आयोजन केले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने 16 मार्चपासून महाराष्ट्र शासन व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या आदेशानुसार महाविद्यालय बंद असून Work From Home चे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी या ऑनलाइन मिटिंगचे आयोजन करणयात आल्याचे सांगून यादरम्यान नैक बंगलोर यांच्याकडे वार्षिक अहवाल ऑनलाइन सादर केल्याचे  प्रा. लिलाधर पाटील यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यास आढावा सादर करण्यास सांगितले. प्रा किशोर पाटील यांनी प्रश्नसंच तयार करून गुगल क्लासरूम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल दिल्याचे सांगितले. डॉ जयवंतराव पाटील, डॉ भगवान भालेराव, प्रा मीनाक्षी इंगोले यांनी लघु संशोधन प्रकल्प पूर्ण करीत असल्याची माहिती दिली. डॉ संगीता चंद्राकर व डॉ राहुल इंगळे यांनी रिसर्च पेपर व अभ्यासक्रम विषयक पुस्तकाचे लिखाण सुरू असल्याची माहिती दिली.
महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ . शैलेश पाटील यांनी साथीच्या आजारांना प्रभावीपणे तोंड देता यावे म्हणून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगा कोर्स तयार करीत असल्याचे सांगितले तर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. प्रशांत पाटील यांनी विभागाचे ऑडीट तयार केल्याची माहिती दिली. या बैठकीत प्रा. प्रवीण पवार, प्रा. महादेव तोंडे, प्रा रमेश पावरा, कैलास आहिरे, एस बी गिरासे आणि संजय विसावे यांनीही अहवाल सादर केले. झूम क्लाउड मीटिंगच्या माध्यमातून या मिटिंगचे आयोजन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner lockdown collage online meeting