esakal | सुट्टीवर आलेले 'ते'कर्मचारी येऊ शकतात सेवेत
sakal

बोलून बातमी शोधा

army man

पोलिस कर्मचार्यावरचा भार कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. एकट्या भडगाव तालुक्यात 60-70 सैनिक व पोलिस सुट्टीवर गावी आले आहेत. तर संपुर्ण राज्यात हा आकडा खूप मोठा   जाऊ शकतो.

सुट्टीवर आलेले 'ते'कर्मचारी येऊ शकतात सेवेत

sakal_logo
By
सुधाकर पाटील

भडगाव : गावी सुट्टीवर आलेले सैनिक व पोलिस कर्मचार्याना लाॅकडाऊनमुळे सुट्टी संपुनही सेवेच्या ठीकाणी जाता येत नाहीये. त्यामुळे अशां कर्मचार्याना ते आहेत त्या ठीकांनी बंदोबस्तासाठी सेवेत हजर करून घेण्याबाबत शासनाने आदेश काढणे गरजेचे आहे. सध्या असे अडकलेले कर्मचारी मेडीकल सर्टिफिकेटस घेऊन आपल्या वरिष्ठांना कळवित आहे. त्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक ठीकाणीच रूजु करून घेतल्यास पोलिस कर्मचार्यावरचा भार कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. एकट्या भडगाव तालुक्यात 60-70 सैनिक व पोलिस सुट्टीवर गावी आले आहेत. तर संपुर्ण राज्यात हा आकडा खूप मोठा   जाऊ शकतो. 

अनेक सैनिक व मुबंई, ठाणे, पुणे, नाशिक यासह राज्यात वेगवेगळ्या ठीकाणी पोलिस म्हणून सेवेत कार्यरत असलेले तरूण हे लाॅकडाऊनमुळे आपल्या गावातच अडकून राहावे लागले आहे. देशात सर्वत्र वाहतुक व्यवस्था बंद असल्याने त्यांना सेवेच्या ठीकाणी जाणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे ते मेडीकल सर्टिफिकेटस घेऊन आपली सुट्टी वाढवितांना दिसत आहे. तर अनेकांना भडगाव  तालुक्यात ही संख्या 60-70 पर्यंत असण्याची शक्यता आहे. 

'त्यां'ना स्थानिक ठीकाणी रूजू करावे 
जे पोलिस कर्मचारी, सैनिक आदि फोर्स मधील कर्मचारी हे गावी सुट्टीवर आले आहेत. त्यातील अनेक जणांच्या सुट्ट्या संपुन गेल्या आहेत. मात्र लाॅकडाऊनमुळे त्यांना आपल्या सेवेच्या ठीकाणी जाता येणे अवघड झाले आहे. देशात सर्वत्र वाहतुक व्यवस्था पुर्णपणे बंद असल्याने सेवेच्या ठीकाणी जायचे कसे? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात  आहे. त्यामुळे त्यांना आपली सुट्टी वाढविण्यासाठी धडपळ करावी लागत आहे. काहींना मेडीकल सर्टिफिकेटसचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे अशा कर्मचार्याना स्थानिक पोलिस स्टेशनला सेवेसाठी तात्पुरत्या स्वरूपात रूजु करून घेणे गरजेचे आहे.

....तर पोलिसांचा भार कमी होईल
लाॅकडाऊन सेवेच्या ठीकाणी जाता येत नसलेल्या पोलिस व सैनिकांना स्थानिक पोलिस स्टेशन ला रूजू करून घेतल्यास पोलिस कर्मचार्यावरचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते. असेही अपुर्या पोलिस कर्मचार्याच्या संख्येमुळे पोलिसांना 16 तासांपर्यंत सेवा बजवावी लागत आहे. सुट्टीवर आलेल्या सैनिक व पोलिसांना स्थानिक ठीकाणी रूजू करून घेतल्यास अशा परिस्थितीत बंदोबस्तासाठी त्यांचा मोठा उपयोग होऊ शकणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने त्या बाबतीत आदेश देणे गरजेचे आहे. तर सैनिकांबाबत खासदारांनी केंद्राकडे याबाबत आदेश होणेबाबत प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

मी सुट्टीवर गावी आलो आहे, माझी अजुन सुट्टी शिल्लक आहे. पण मला  स्थानिक ठीकाणी सेवा करण्याची संधी मिळाल्यास द्यायला तयार आहे. तर अनेकांची सुट्टी संपली आहे पण त्यांना सेवेच्या ठीकाणी जात येत नाहीये त्यामुळे ते स्थानिक ठीकाणी  सेवेसाठी उपयोगी येऊ शकतात.
- रविंद्र महाजन भारतीय सैनिक