आता बस्स,भुजबळ सोडून कुणीही चालेल-राष्ट्रवादीच्या निष्ठांवंताचा पवित्रा

संजीव निकम,नांदगाव
शुक्रवार, 19 जुलै 2019

नांदगाव- तुमची निवडणूक आली की, पक्ष म्हणून आम्ही सर्व काम करायचे अन काम संपले की तुम्ही सगळे विसरून जायचे,खूप सोसले यापुढे नांदगाव मतदार संघात पक्षाने भुजबळ सोडून अन्य कुणालाही उमेदवारी द्यावी अथवा अथवा आघाडीतल्या मित्र पक्षाला उमेदवारी दिली तरी चालेल मात्र कुठल्याही परिस्थितीत भुजबळ नकोच असा आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीच्या जुन्या निष्ठावानांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नांदगाव- तुमची निवडणूक आली की, पक्ष म्हणून आम्ही सर्व काम करायचे अन काम संपले की तुम्ही सगळे विसरून जायचे,खूप सोसले यापुढे नांदगाव मतदार संघात पक्षाने भुजबळ सोडून अन्य कुणालाही उमेदवारी द्यावी अथवा अथवा आघाडीतल्या मित्र पक्षाला उमेदवारी दिली तरी चालेल मात्र कुठल्याही परिस्थितीत भुजबळ नकोच असा आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीच्या जुन्या निष्ठावानांनी घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेबराव पाटील,अरुण पाटील,संतोष गुप्ता,राजाभाऊ पगारे या महत्वाच्या नेते पदाधिकार्यांनी आपापल्या पदाच्या दिलेल्या राजीनामा सत्रानंतर मतदार संघातल्या  राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतोष धुमसत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी जेष्ठ नेते साहेबराव पाटील यांच्या भालुर येथील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते हा भुजबळांना विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा धक्के मानला जात आहे यापुढे भुजबळांसोबत नांदगाव मतदार संघात काम करणे शक्य नाही.दहा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार असूनही जनतेचे प्रश्न सुटले नाही तर पक्ष स्थापना काळापासून सोबत असलेल्या निष्टवान कार्यकर्त्यांचीही अवस्था चिंता करण्यासारखीआहे

भुजबळांनी निवडणूक लढवायची तर सगळ्यांनी मदत करायची मात्र पक्षाच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकीत भुजबळ वेगळी भूमिका घेत असल्याने आता कुठल्याही परिस्थितीत पक्षाने उमेदवार बदलावा मात्र भुजबळ नकोच अशी भूमिका जेष्ठ नेते साहेबराव पाटील,माजी तालुकाध्यक्ष दिलीप इनामदार,अलीकडेच तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा सोपविलेले संतोष गुप्ता,माजी नगराध्यक्ष अरुण पाटील यांनी बैठकीत मांडली आपल्या या भूमिकेच्या स्पष्टीकरणार्थ या नेत्यांनी आगामी काळात घेण्यात येणारी दिशा ठरविण्यासाठी पुन्हा बैठक घेण्याचे संकेत दिले राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून व त्याअगोदर पासून शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून एकनिष्ठ असलेल्या साहेबराव पाटील,दिलीप इनामदार अरुण पाटील यांनी भुजबळ यांच्या आगमनापासून ते आपजपावेतो आलेल्या अनुभवांचे कथन केले

    तुरुंगात गेलेल्या मोठ्या भुजबळ साहेबाना जमीन मिळावा म्हणून नवस करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यथा समजून घेण्याऐवजी करण्यात येणाऱ्या दुर्लक्षावर बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांनी टीकेची झोड उठविली जिल्हापरिषद ,पालिका सारख्या निवडणुकात  कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आल्याने आर्थिक मानसिक नुकसान झाले त्याबाबत साधी दखल भुजबळांनी घेतलेली नाही असा आरोपही बैठीकीत करण्यात आला त्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत भुजबळ आम्हाला चालणार नाही असा निर्धार सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला

बैठकीला माजी सभापती राजाभाऊ आहेर,मनमाडचे माजी नगराध्यक्ष योगेश पाटील,नांदगावचे माजी नगराध्यक्ष काका सोळसे,माजी नगरसेवक विलासराव राजुळे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तू पवार,अतुल पाटील,सतीश आहिरे,राजाराम घुगे,कांतीलाल छाजेड,नगरसेवक सुरज पाटील,राजू आहेर हरी देसले,अमोल पगारमधुकर बोरसे बाळू मोरे सखाराम भुसणार,संजय गंधाक्षे बाबाजी शिरसाठ सुमित गुप्ता दिनकर पाटील  इत्यादी उपस्थित होते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhujbal virodh