esakal | रेल्वेने मंगळवारी मुंबई, सुरतला जाताय...अगोदर हे पहा
sakal

बोलून बातमी शोधा

railway mega block

अप-डाऊन करणाऱ्यांनाही रेल्वेऐवजी पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान, या दिवशी आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 

रेल्वेने मंगळवारी मुंबई, सुरतला जाताय...अगोदर हे पहा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव ते भादली दरम्यान तिसऱ्या रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे 18 फेब्रुवारीस मध्य रेल्वेतर्फे चार तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक अप व डाऊन या दोन्ही मार्गांसाठी आहे. सकाळी नऊ ते दुपारी एक दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. या दरम्यान चाकरमान्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून, अप-डाऊन करणाऱ्यांनाही रेल्वेऐवजी पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. दरम्यान, या दिवशी आठ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 

अप मार्गावरील या गाड्यांना उशीर 
गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्‍स्प्रेस भादली स्थानकापासून 10.15 ते 1.15, भागलपूर-सुरत ताप्तीगंगा एक्‍स्प्रेस भुसावळ स्थानकापासून 11.55 ते 1.15, गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍स्प्रेस 12 ते 1.20, लखनौ-मुंबई पुष्पक एक्‍स्प्रेस 12 ते 1.15, नवी दिल्ली-बेंगळुरू कर्नाटक एक्‍स्प्रेस सावदा स्थानकापासून 12.35 ते 1.15, हावडा-मुंबई गीतांजली एक्‍स्प्रेस 12.55 ते 1.15 दरम्यान या सर्व गाड्या ब्रेक घेऊन चालविल्या जातील. 

डाऊन मार्गावर या गाड्यांना उशीर 
अहमदाबाद-हावडा एक्‍स्प्रेस पाळधी स्थानकापासून 10.20 ते 12.50, उधना-दानापूर एक्‍स्प्रेस चावलखेडा स्थानकापासून 12.10 ते 1.05, लोकमान्य टिळक टर्मिनस-अलाहाबाद तुलसी एक्‍स्प्रेस शिरसोली स्थानकापासून 11.35 ते 1.15, मुंबई-हावडा गीतांजली एक्‍स्प्रेस म्हसावद स्थानकापासून दुपारी 12.5 ते 1.15, वास्को दि गामा-हजरत निजामुद्दीन गोवा एक्‍स्प्रेस माहेजी स्थानकापासून 12.10 ते 1.15, लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर काशी एक्‍स्प्रेस पाचोरा स्थानकापासून 12.50 ते 1.15. 
पाळधी, चावलखेडा, शिरसोली, म्हसावद, माहेजी, पाचोरा या रेल्वेस्थानकांपासून गाड्या कमी वेगाने धावणार आहेत, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. 

रद्द केलेल्या गाड्यांचा तपशील 
पॅसेंजर : 17 फेब्रुवारी- अप मार्ग भुसावळ-देवळाली शटल, 18 फेब्रुवारी-डाऊन मार्ग देवळाली-भुसावळ शटल, 17 फेब्रुवारी- डाऊन मार्ग सुरत-भुसावळ पॅसेंजर, 18 फेब्रुवारी- अप मार्ग भुसावळ-सुरत पॅसेंजर, 17 फेब्रुवारी- डाऊन मार्ग सुरत-भुसावळ पॅसेंजर, 18 फेब्रुवारी- अप मार्ग भुसावळ-सुरत पॅसेंजर. 
एक्‍स्प्रेस ः 17 फेब्रुवारी- डाऊन मार्ग बांद्रा टर्मिनस-भुसावळ खानदेश एक्‍स्प्रेस, 18 फेब्रुवारी- अप मार्ग भुसावळ-बांद्रा टर्मिनस खानदेश एक्‍स्प्रेस. 
 

loading image