esakal | सत्तापालट होऊनही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कायम...!
sakal

बोलून बातमी शोधा

education department fadnvis

सत्तापालट होऊनही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस कायम...!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : सर्वांना शिक्षणाचे डोस पाजणाऱ्या शिक्षण विभागालाच सामान्यज्ञान शिक्षणाचे डोस पाजवण्याची गरज आहे. कारण माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या व उच्च शिक्षण संचनालायसंकेत स्थळावर अद्यापही मुख्यमंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती झळकत आहे. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे  व उच्च शिक्षण संचनालाय यांच्या संकेतस्थळावर अद्यापपर्यंत जुनीच माहिती आहे. ही माहिती वेळोवेळी अपडेट करण्याची गरज असतानाही अद्यापपर्यंत ही माहिती अपडेट करण्यात आली नाही. युवा सेनेतर्फे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षण विभागाला मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री कोण आहे, हे माहीत नसेल तर ही गंभीर बाब आहे. यामुळे सत्तापालट होऊनही शिक्षण विभाग हा भाजप प्रेमातून बाहेर पडलेला नाही, राज्यात सत्तापालट होऊन आघाडी सरकारची सत्ता स्थापन झाली असून, आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आहेत राज्यात सत्तापालट झाले तरी शिक्षण विभाग अनभिज्ञ आहे. याबाबत कारवाई ची मागणी युवासेना शहर प्रमुख सुरज पाटील यांनी केली आहे.

शिक्षण मंत्री ही तावडेच
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या व उच्च शिक्षण संचनालायसंकेतस्थळावर आजही मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची माहिती दाखवली जात आहे याचबरोबर शिक्षणमंत्री म्हणून विनोद तावडे यांची माहिती दाखवली जात आहे तसेच आयुक्त, सचिवपदीही जुन्याच अधिकाऱ्यांची माहिती आहे.

जुनाच अभ्यासक्रम
तसेच संकेतस्थळावर अजूनही सायन्स विभागाच्या ११ वी व १२ वीचा अभ्यासक्रम जुनाच असून अनुदानित महाविद्यालयातील खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांसाठी तो अपलोड करण्यात आलेला नाही. विभागातर्फे नवीन अभ्यासक्रम असलेल्या १२ सायन्सची पुस्तके प्रकाशित झाली नाही.

loading image
go to top