esakal | भुसावळमध्ये पुन्हा दोन कोरोणा पॉझिटिव्ह 

बोलून बातमी शोधा

corona positive

जिल्हा रेडझोनमध्ये असून, जिल्ह्यातील अमळनेर हा हॉटस्पॉट ठरला आहे. या पाठोपाठ भुसावळ येथील रूग्णांची संख्येत देखील वाढ होवू लागली आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या एकूण 60 झाली आहे.

भुसावळमध्ये पुन्हा दोन कोरोणा पॉझिटिव्ह 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असून आज दिवसभरात पाच कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण असल्याचा अहवाल शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास प्राप्त झाला. रात्री प्राप्त दोन अहवाल हे भुसावळ येथील रूग्णांचे असून यातील एक रूग्ण अगोदरच्या रूग्णाचा नातेवाईक तर दुसरा रूग्ण नवीन असल्याचे सांगण्यात येत आहे. 
जिल्हा रेडझोनमध्ये असून, जिल्ह्यातील अमळनेर हा हॉटस्पॉट ठरला आहे. या पाठोपाठ भुसावळ येथील रूग्णांची संख्येत देखील वाढ होवू लागली आहे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या एकूण 60 झाली आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयास दिवसभरात प्राप्त अहवालातील पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात दुपारी प्राप्त झालेला रूग्ण भुसावळ येथील होता तर अन्य दोन रूग्ण पाचोरा येथील होता. तर रात्री दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. हे दोन्ही जण भुसावळ येथील रहिवासी आहेत. 

एक नवा रूग्ण 
भुसावळ येथील दोन्ही रूग्ण असून, यातील एक रुग्ण सिंधी कॉलनीतील तर दुसरा रुग्ण कुठला आहे ते अद्याप समजले नाही. सिंधी कॉलनीतील रुग्ण हा येथे आढळून आलेल्या पहिल्या रुग्णाचा नातेवाईक आहे. तर रुग्ण हा नवीन आहे. आज भुसावळ शहरात तीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे भुसावळमधील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे. दोन रुग्ण मयत असल्यामुळे 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.