भुसावळात अत्यावश्यक रुग्णसेवेसाठी डॉक्टरांची अशीही तत्परता

doctor
doctor

भुसावळ : एकीकडे शहरातील खाजगी दवाखाने बंद असल्याच्या चर्चेने जनतेत संभ्रमाचे वातावरण असतांनाच दुसरीकडे भुलतज्ज्ञासह सर्व डॉक्टर एकत्र येऊन अत्यावश्यक शस्त्रक्रिया करीत रुग्णासेवेत तत्परता दाखवत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत अॅपेन्डिस व पोटाच्या विकारा संदर्भातील तातडीच्या शस्त्रक्रिया शहरातील विविध रुग्णालयात यशस्वी करण्यात आल्या.
कोरोनाच्या दहशतीमुळे खाजगी दवाखाने बंद असलेल्या बाबतच्या तक्रारी येत होत्या. त्यात काही प्रमाणात तथ्य होते. अनेक रुग्णांचे हाल होत होते. मात्र या पार्श्वभूमीवर सुद्धा आता रुग्णांना चांगला अनुभव येत असल्याचीही उदाहरणे समोर येत आहेत. जळगाव जामोद येथील एक 27 वर्षाची तरुणी अपेंडिक्सच्या विकाराने त्रस्त होती. भुसावळच्या विश्वनाथ हॉस्पिटल तीला आणण्यात आले. डॉ. विनायक महाजन यांनी तिच्यावर अत्यावश्यक म्हणून शस्त्रक्रिया केली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. संज्योत पाटील व डॉ. दीपक जावळे ह्यांनी तातडीने मदत केली. डॉ. वीरेंद्र झांबरे यांच्या प्रतिभा हॉस्पिटल मध्ये पोटातील गोळ्या मुळे असह्य वेदना होत असलेल्या 55 वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यांना तिथे भूल तज्ञा डॉ. देवयानी नेहेते व डॉ. हर्षा फिरके यांनी तातडीने येऊन मदत केली. याच दिवशी डॉ. प्रदीप फेगडे यांच्या मुक्ताई हॉस्पिटल मध्ये एका नवजात अर्भकावर एनआयसीयु मधे तातडीचे उपचार करण्यात आले. श्री रिदम हॉस्पिटल मधील अतिदक्षता विभागात रोज किमान 3 ते 4 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होत आहेत. इतर सर्जिकल हॉस्पिटल्स मध्ये देखील अत्यावश्यक शस्त्रक्रिया होत आहेत. नगरसेवक पिंटु कोठारी हे काही दिवसांपूर्वी एका रक्तबंबाळ मुलाला डॉ. किरण झांबरे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले असता त्यांना देखील याचा अनुभव आला.

काही वेळा दवाखाने बंद राहतात यात प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ (हॉस्पिटल स्टाफला येण्यास अडचणी) आणि अपुरी साधन सामुग्री अशी कारणे आहेत. शहरात अनेक प्रतिबंधित क्षेत्रे आहेत यामुळे महत्वाचे मुख्य रस्ते बंद आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा कर्मचारी कामावर येऊ शकत नाहीत. ओपन क्षेत्रात जवळ - जवळ सगळ्या दवाखान्यात प्रशासनाने सूचना दिल्या पासून अत्यावश्यक रुग्ण सेवा चालू आहेत. 
डॉ. नितीन दावलभक्त, भुसावळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com