
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी (ता. ५) खडका रोड भागातील ५८ वर्षीय महिला तर बुधवारी (ता. ६) गंगाराम प्लॉट भागातील ५९ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते.
धक्कादायक : भुसावळातील दोघा कोरोना बाधितांचा मृत्यू
भुसावळ : शहरातील गंगाराम प्लॉट आणि खडका रोड भागातील दोघा कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आज उघडकीस आले आहे. त्यामुळे शहरवासियांमध्ये एकच खळबळ उडाली असून, भुसावळातील मृत रुग्णांची संख्या आता चारवर गेली आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी (ता. ५) खडका रोड भागातील ५८ वर्षीय महिला तर बुधवारी (ता. ६) गंगाराम प्लॉट भागातील ५९ वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. याआधीच खडका रोड भागातील मृत महिलेच्या संपर्कातील डॉक्टरांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर गंगाराम प्लॉट भागातील रुग्णाची आईचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेत पुण्याहून आलेले नातेवाईकांची हजेरी लावली होती. त्यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाइकांना देखील आधीच क्वारंटाइन करण्यात आले आहे. शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या आता १६ झाली असून, यातील दोघांचा पूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे मयतांची संख्या देखील चारवर गेली आहे.
Web Title: Marathi News Bhusawal Corona Virus Two Death
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..