दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमास जाणाऱ्या  दोघांची आरोग्य तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 एप्रिल 2020

देशभरातून धर्मप्रसार करणारे धर्मगुरू सहभागी झाले होते. यात भुसावळातील दोघांनी कार्यक्रमास हजेरी लावली असून, यात एका रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार पोलिसांकडून या दोघांचा शोध घेण्यात आला.

भुसावळ  : दिल्ली येथे तबलीगे जमात या संस्थेच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. त्यानंतर तेथे देशभरातून गेलेल्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात भुसावळ शहरातील दोघांना आज आरोग्य तपासणीसाठी जळगाव रवाना करण्यात आले. 

दिल्ली येथे झालेल्या तबलीगे जमातच्या कार्यक्रमात देशभरातून धर्मप्रसार करणारे धर्मगुरू सहभागी झाले होते. यात भुसावळातील दोघांनी कार्यक्रमास हजेरी लावली असून, यात एका रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या सूचनेनुसार पोलिसांकडून या दोघांचा शोध घेण्यात आला. यानंतर त्यांना आरोग्य विभागाकडे तपासणीसाठी सुपूर्द करण्यात आले. आरोग्य विभागाने त्यांची रवानगी जळगाव येथे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यातील रेल्वे कर्मचारी हा शिमला येथे जाऊन आल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, पहूर (ता. जामनेर) येथेही असाच धार्मिक कार्यक्रम जानेवारीत झाला होता. यात सहभागी झालेल्या पाच जणांचीही वैद्यकिय तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांना कुठलाही त्रास नसल्याने केवळ काळजी घेण्याच्या सूचना देऊन सोडण्यात आ
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Health check-up of two people going to religious program in Delhi