भुसावळात भाजीपाल्याची होम डिलेव्हरी... अभियंत्यांनी बनवले "मींक्षा" ऍप 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

भुसावळ शहरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुविधा उपलब्ध करून देतांना करोना विषाणू नियंत्रणाची सर्व नियम पाळले जाणार आहेत. भाजीपाला घरपोच प्राप्त करण्यासाठी इच्छुकांनी या अॅपद्वारे आपण ऑर्डर करावी. त्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.

भुसावळ : येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले भावी अभियंते मितेश गुजर, सुरज पाटील व मृगेन कुलकर्णी व शेतकरी संघ दापोरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरू असताना नागरिकांच्या आरोग्यासाठी "मींक्षा" ऍप तयार केले. भुसावळात ऍप  उद्घाटन जेष्ठ नागरिक शशिकांत वाघ, प्रा.धिरज पाटील, सुरज पाटील, मृगेन कुळकर्णी यांनी केले.

संचारबंदी असल्याने घरपोच भाजी, फळे देण्याची सुविधा जळगाव, एरंडोल नंतर भुसावळ शहरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुविधा उपलब्ध करून देतांना करोना विषाणू नियंत्रणाची सर्व नियम पाळले जाणार आहेत. भाजीपाला घरपोच प्राप्त करण्यासाठी इच्छुकांनी या अॅपद्वारे आपण ऑर्डर करावी. त्यासाठी काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. ऑर्डरची रक्कम शक्यतो नेटबँकिंग, कार्ड, गूगल पे अथवा फोन पे अथवा अन्य कोणत्याही क्यू आर कोडच्या डिजिटल पद्धतीने भाजीपाला डिलिव्हरीसाठी आल्यावर जमा करावे. भाजीपाला डिलिव्हरीसाठी आल्यावर सर्वांनी करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपण ऑर्डर दिलेल्या भाजीपाल्याची डिलिव्हरी २४ तासांच्या आत देण्यासाठी प्रयत्न राहील असे मितेश गुजर याने सांगितले.

कोरोनाच्या काळात अत्यंत प्रभावी पणे काम करेल त्यामुळे  बाजारातून भाजीपाला घेतांना अनेक ग्राहकांचा भाजीपाल्याला स्पर्श होतो तसेच लोकांची गर्दी झालेली दिसत आहे अशा वेळेस संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो, कोरोनामुळे उद्भवलेल्या अशा गंभीर परिस्थितित भुसावळकरांना थेट घरपोच भाजीपाला आणि फळे तेही अत्यंत कमी भावात देण्याचे काम ही शेतकऱ्याची मुलं करता आहेत कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता करणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे, विभागप्रमुख डॉ. पंकज भंगाळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Home Delivery of Vegetable in Bhusawal Engineers Made "Meeksha" App