लॉकडाऊन मध्ये होतय ऑनलाईन मीटिंग व गप्पाटप्पा 

श्रीकांत जोशी
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

आपल्या नातेवाईकांना एकत्र जमून गप्पा टप्पा मारणे सुरु केले आहे. त्यासाठी झूम, स्काईप व गुगल डुओ या ऍप चा वापर केला जात आहे.

भुसावळ  : लॉकडाऊन मध्ये घरात बसून असलेल्या लोकांनी आता ऑनलाईन पर्याय वापरत मीटिंगमध्ये सहभागी होणे, आपल्या नातेवाईकांना एकत्र जमून गप्पा टप्पा मारणे सुरु केले आहे. त्यासाठी झूम, स्काईप व गुगल डुओ या ऍप चा वापर केला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढुनये म्हणुन म्हणून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. सामाजिक अंतर राखण्यासाठी घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले. बहुतेकजण घरातच बसून आहे. संस्थांच्या मिटींगला जाणे, नातेवाईकांना भेटणे बंद झाले आहे. मात्र माणूस अडचणींवर मात करत काहीतरी पर्याय शोधत असतो. सध्या मीटिंग आयोजित करण्यासाठी झुम या ऍप चा वापर केला जात आहे. यात सहभागी होण्यासाठी मोबाईल नंबर ची आवश्यकता नसते जो होस्ट असतो त्याने मिटिंग क्रिएट केली की आयडी टाकतो.

ज्याच्याकडे तो आयडी येईल तो टाकला की त्याला मिटिंग मध्ये सहभागी होता येते. एका वेळी शंभर लोक सहभागी होऊ शकतात. मीटिंग चाळीस मिनिटे घेता येते. यासाठी फ्री वर्जन आहे. यापेक्षा जास्त वेळ हवा असल्यास पेड व्हर्जन वापरावे लागते. भुसावळ रोटरी रेल सिटीने नुकतीच झूम मीटिंग घेतली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल चेतन पाटील होस्ट होते. यावेळी रेल सिटी हॉस्पिटल मध्ये गरजू रुग्णांना पुरवत असलेल्या जेवणाच्या पाकीटा बाबत माहिती सचिव मनोज सोनार यांनी सदस्यांना दिली. अशीच मीटिंग लॉकडाऊन संपल्या नंतरही नियमितपणे घेण्यात यावी त्यामुळे क्लबचा हॉल व जेवणावर  होणारा खर्च वाचेल. त्यातुन अधिक सामाजिक उपक्रम राबविता येतील अशी प्रेमळ विनंती ज्येष्ठ सदस्य सुनील पाटील यांनी केली. इतरही सामाजिक संस्था अशा प्रकारच्या मीटिंग आयोजित करीत आहे.

 

नातेवाईक एकत्र येऊन गप्पा मारतात

व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल केला तर फक्त चार जणच एकावेळी कनेक्ट होऊ शकतात. स्काईप ऍपचा वापर केला तर ५० व गुगल डुओचा वापर केला तर एकावेळी आठ लोक कनेक्ट होऊ शकतात. यातून परगावी असलेल्या नातेवाईकांना एकत्र जमून गप्पा मारल्या जात आहेत. विशेषतः ज्येष्ठांच्या भेटी घडवून आणल्या जात आहे. हा सर्व उपद्व्याप घरातील टेक्नोसॅव्ही तरुण मंडळी करीत आहे. ऑनलाइन का होईना मामा, मावशी, काका, काकु, आजी, आजोबा, बहिण, भाऊ यांच्या भेटी झाल्याने सगळेच खुष झाले. आम्ही काही गेम पण खेळलो असे मधुली गोरे या तरुणीने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal Online meeting and chat takes place in Lockdown