सरपंच चषकाचा जय बजरंग ठरला मानकरी 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 January 2020

भुसावळ : ग्रामपंचायत साकेगाव व जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटना आयोजित सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात जय बजरंग ने जय महाराष्ट्रावर सात गडी राखून विजय संपादन केले. विजेत्या संघाचा फोटो व चषक सन्मान म्हणून वर्षभर ग्रामपंचायत कार्यालयात ठेवण्यात येते हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य. अंतिम सामन्यापूर्वी जय बजरंग व जय महाराष्ट्र दोन्ही संघांची बैलगाडी वरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना जय महाराष्ट्र संघाने निर्धारित दहा षटकात ६४ धावा केल्या, यात सर्वात जास्त डॉ. दीपक पाटील यांनी २९ धावा काढल्या. प्रत्युत्तरात जय बजरंग संघाने विजय लक्ष ७ गडी राखून ७ षटकात हर्षल पाटील (बंटी) जय बजरंग च्या या खेळाडूने ५ उत्तुंग षटकार टोलवून नाबाद ४८ धावा काढत, सहजरीत्या विजय मिळवून दिला व मानाचा 'सरपंच चषक'वर प्रथमच जय बजरंग संघाने आपले नाव कोरले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून जय महाराष्ट्राच्या डॉ. दीपक पाटील, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जय महाराष्ट्राच्या शुभम पाटील व मालिकावीर जय बजरंग च्या हर्षल पाटील यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी आमदार संजय सावकारे, प्रा. सुनील नेवे, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, युनियन बँकेचे शाखा व्यवस्थापक सैय्यद खादिम, सरपंच अनिल पाटील, दिलीपसिंग पाटील, ग्रामविकास अधिकारी गौतम वाडे, आनंदा ठाकरे, जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल आदी उपस्थित होते. पंच म्हणून राहुल कोळी, शाहरुख शेख, समालोचक म्हणून हाजी रमजान पटेल, गुणलेखक म्हणून राजू भोईटे यांनी काम पाहिले. 
 
विजयी संघांवर बक्षिसांचा वर्षाव 
विजय संघ जय बजरंग ला ग्रामपंचायत तर्फे २५ हजार, माजी सरपंच आनंद ठाकरे -पाच हजार, आमदार संजय सावकारे -तीन हजार, डॉ. दीपक पाटील -तीन हजार, शांताराम कोळी -दोन हजार, विनोद कोळी- एक हजार, नितीन धांडे पाचशे. उपविजेत्या जय महाराष्ट्र संघाला जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघटनेतर्फे पाच हजार, पप्पू पटेल- पाच हजार, आमदार संजय सावकारे -दोन हजार, विनोद परदेशी -एकविसशे असे रोख व धनादेशद्वारे बक्षिस देण्यात आले.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bhusawal sarpanch chashak cricket compitetion jay bajarang winner