esakal | रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे दहा गाड्या रद्द 
sakal

बोलून बातमी शोधा

indian train

रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे दहा गाड्या रद्द 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळाकडून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक कल्याण ते कसारा मार्गावर घेण्यात येणार आहे. तसेच टीटवाला येथे पादचारी पुलाचे गर्डरचे काम करण्यात येणार असून, या निमित्ताने काही गाड्या रद्द व मार्ग परिवर्तन होणार आहे. हा ब्लॉक १३ मार्चला मध्यरात्री २ ते सकाळी ६ पर्यत काम केले जाणार आहे. 

या ब्लॉकमुळे १४ मार्चला (१७६१२) डाउन मुंबई - नांदेड राज्यराणी एक्स्‍प्रेस, (१२११७) अप मनमाड - एलटीटी गोदावरी एक्स्‍प्रेस, (१२११८) डाउन लोतिट - मनमाड गोदावरी एक्स्‍प्रेस, (१२१११) डाउन मुंबई-अमरावती एक्स्‍प्रेस, (११४०१) डाउन मुंबई - नागपूर एक्स्‍प्रेस, (५११५३) डाउन मुंबई - भुसावळ पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. तर १३ मार्चला ( १७६११) अप नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्‍प्रेस, (१२११२) अप अमरावती-मुंबई एक्स्‍प्रेस, (११४०२) अप नागपूर-मुंबई एक्स्‍प्रेस, (५११५४) अप भुसावळ - मुंबई पॅसेंजर रद्द आहे. 

मार्गात बदल झालेल्या गाड्या 
१२ मार्चला (११०६२) अप मुजफ्फरपुर- लोटिट एक्स्‍प्रेस आणि (१२५४१) अप गोरखपुर-लोटिट एक्स्‍प्रेस या गाड्या जळगाव- वसई रोड मार्गे जातील. (११०१६) अप गोरखपुर-लोटिट एक्स्‍प्रेस आणि (११०५८) अप अमृतसर-लोटिट एक्स्‍प्रेस मनमाड-दौंड जाईल. तर १४ मार्चला (११०२५) अप भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्‍प्रेस मनमाड- दौंड मार्गे जाणार आहे. तसेच १४ मार्चला (१२५४१) अप लोटिट- गोरखपुर एक्स्‍प्रेस ही लोटिट वरुन ११.१० ऐवजी १२.५ ला सुटेल. (११०१६) अप लोटिट -गोरखपुर एक्स्‍प्रेस १२.१५ ऐवजी पहाटे ३.५० ला रवाना होईल. 

मार्गात थांबवण्यात येणाऱ्या गाड्या 
१४ मार्चला (१८०३०) अप शालीमार एक्स्‍प्रेस लोटिट ऐवजी कसारा स्थानकावर थांबेल. (१२८१०) अप हावडा-मुंबई मेल मुंबई ऐवजी इगतपुरी थांबेल. (१२१०२) अप हावडा- लोटिट ज्ञानेश्वरी सुपर डीलक्स एक्स्‍प्रेस लोटिट ऐवजी इगतपुरी स्थानकावर थांबणार आहे. (१२५४५) अप रक्सोल - लोटिट कर्मभूमी एक्स्‍प्रेस लोटिट ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्थानकावर थांबेल. (१२१०६) अप विदर्भ एक्स्‍प्रेस मुंबई ऐवजी इगतपुरी अगोदर सुविधा जनक स्थानकावर थांबणार आहे. (१७०५८) अप सिकंदराबाद- मुंबई देवगिरी एक्स्‍प्रेस मुंबई ऐवजी सुविधा जनक येथे थांबेल. (१२१३८) अप फिरोजपुर-मुंबई पंजाब मेल मुंबई ऐवजी जनक स्थानकावर थांबवन्यात येणार आहे. (१२१५४) अप हबीबगंज-लोटिट एक्स्‍प्रेस लोकमान्य टिलक टर्मिनल ऐवजी सुविधा जनकला थांबेल. (१२२९०) अप नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्‍प्रेस ही मुंबई ऐवजी सुविधा जनक स्थानकावर थांबवण्यात येणार आहे. 
 

loading image