धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप महिला पदाधिकारी रस्त्यावर 

धनराज माळी
Wednesday, 20 January 2021

जोपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. केवळ राजकीय दबावापोटी ही केस खोटी आहे असे कारणे देऊन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला.

नंदुरबार : महिला अत्याचार प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राजकीय दबावापोटी पोलिस ठाण्यात अन्यायग्रस्त महिलेची फिर्याद घेतली जात नसल्याचा आरोप केला आहे. 
भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाकडून जिल्हाध्यक्षा किन्नरी सोनार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नवापूर चौफुलीपासून सकाळी अकराला मोर्चा काढला.

जिल्ह्यातून आलेल्या भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हातात निषेध फलक घेऊन घोषणाबाजी केली. अर्ध्या तासात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. महिला मोर्चाच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले, अन्यायग्रस्त महिला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा विरोधात बलात्कार तथा लैंगिक अत्याचार विरोधात फिर्याद दाखल करण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जात आहे. पोलिस स्टेशन तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर महिलेने मुंबई पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. परंतु आजपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. केवळ राजकीय दबावापोटी ही केस खोटी आहे असे कारणे देऊन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. 

निवेदनावर जिल्हाध्यक्षा किन्नरी सोनार, जिल्‍हा परिषद सदस्य संगीता गावित, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सपना अग्रवाल, महिला मोर्चा प्रदेश सदस्य सविता जयस्वाल, सरचिटणीस नीला मेहता, ज्येष्ठ पदाधिकारी कल्पना पंड्या, नवापूर शहराध्यक्षा जिग्नेश राणा, तालुकाध्यक्षा प्रतिभा पवार, प्रसिद्धिप्रमुख भावना लोहार, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षा अनामिका चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news BJP women activists dhananjay munde's resignatio

टॉपिकस
Topic Tags: