नाव नोंदणी करा, मगच गावात पाऊल टाका...जामठी गावात नाकेबंदी !

सचिन महाजन
बुधवार, 25 मार्च 2020

जामठी गावामध्ये जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून गावात जाताना आपले नाव नोंदवून घेण्यास बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या व्यक्तींना विचारूनच आत प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे एखादा संशयित रुग्ण सहजासहजी गावात जाऊ शकत नाही.

जामठी(ता.बोदवड) : गावाबाहेरून येत असाल तर अगोदर नाव नोंदणी करा, कोठून आले, तपासणी झाली का याची माहिती द्या तरच गावात प्रवेश करा अशी कडक नाकेबंदी जळगाव जिल्हयातील जामठी (ता.बोदवड)येथील गावांने केली आहे. 

गावाच्या बाहेर असलेल्या सिमारेषेवर नागरिकांनी दोर बांधून तसेच नाकाबंदी दंडा लावला असुन तिथे ग्रामपंचायतीचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 
त्यामुळे नागरिकांना सहजासहजी गावात प्रवेश मिळू शकत नाही. जामठी गावामध्ये जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून गावात जाताना आपले नाव नोंदवून घेण्यास बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला ग्रामपंचायतीने नेमून दिलेल्या व्यक्तींना विचारूनच आत प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे एखादा संशयित रुग्ण सहजासहजी गावात जाऊ शकत नाही. जामठी गावाचा हा निर्णय खरच चांगला आणि आदर्शव्रत आहे. जर प्रत्येक गावाने घेतला तर कोरोनाशी आपण सहज सामना करू शकतो.सुरुवातीला देशाच्या काही भागात पसरलेल्या कोरोनाने आता सगळीकडे थैमान घातलं आहे. त्यामुळे आता अगदी गाव-गावात देखील बाहेरली येणाऱ्या व्यक्तींना बंदी घालण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची नोंद घेतली जात असून बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रथम दर्शनी तपासणी करून येण्यास सांगितले जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news bodwad Blockade in Jamthi village