करीअरचा राजमार्ग दाखविणाऱ्या  "अधिकारी व्हायचंय मला'चा दिमाखात शुभारंभ 

residentional photo
residentional photo

नाशिक: नियमित अभ्यासक्रमापलीकडे जाऊन करीअर घडविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे. स्पर्धा परीक्षांविषयी शालेय जीवनात प्रोत्साहन देतांना त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या "अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाचा मंगळवारी (ता.3) दिमाखात शुभारंभ झाला. "सकाळ' माध्यम समूहातर्फे मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, जिल्हा परिषदेच्या सहभागातून राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्‍त ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्‍त केला. 

"अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे होत्या. याप्रसंगी "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमाताई पवार, शिक्षण व आरोग्य विभागाचे सभापती यतींद्र पाटील, बांधकाम व अर्थ विभागाच्या सभापती मनिषा पवार, स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.वैशाली झनकर-वीर, प्राथमिक शिक्षण विस्तार अधिकारी नीलेश पाटोळे, टार्गेट एज्युकेशनचे संचालक डॉ.प्रवीण बन्सल, मविप्रचे सेवक संचालक गुलाबराव भामरे, मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ.डी.डी. काजळे, डॉ.एस. के. शिंदे, सी.डी. शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माहिती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. 
   उपक्रमाची माहिती देतांना "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने म्हणाले, की औद्योगिक क्षेत्रासह अन्य विविध पातळ्यांवर आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी पदवीनंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरवात करतात. याउलट उत्तर भारतातील पिछाडलेल्या राज्यांतील मुलांचे जन्मापासून धडपड सुरू होते. याअनुषंगाने सामाजिक गुंतवणूक करतांना भविष्यातील गुणवंत विद्यार्थी घडविण्याच्या ध्यासातून उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परीषद, मविप्रची साथ लाभल्याने उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या करीअरला दिशा देण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्‍त केला. 

या उपक्रमासाठी नॉलेज पार्टनर म्हणून नाशिक येथील स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी व टेक्‍निकल पार्टनर म्हणून टारगेट एज्युकेशन या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. उद्‌घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केटीएचएम महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. डी. पी. पवार यांनी केले. आभार "सकाळ'चे मुख्य बातमीदार महेंद्र महाजन यांनी केले. 

शंभर दिवसात प्रश्‍नांतून ज्ञानवर्धन : पाटोळे 
"अधिकारी व्हायचंय मला' उपक्रमातून उद्या (ता.4) पासून पुढील शंभर दिवस "सकाळ'मधून प्रश्‍नमाला प्रसिद्ध केली जाईल. रोज दहा प्रश्‍न असे शंभर दिवसात अकराशे प्रश्‍नांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञानवर्धन केले जाईल, त्यांच्यात वाचनाविषयी गोडी लावण्यासही उपक्रम उपयुक्‍त ठरेल असे श्री.पाटोळे यांनी सांगितले. शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत या उपक्रम यशस्वीतेसाठी सर्व घटकांनी सर्वोत्परी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

विद्यार्थ्यांना करीयरचा मिळेल राजमार्ग : पाटील 
औपचारीक शिक्षणासोबत जीवनात यशस्वी होण्याचा मुलमंत्र शाळकरी विद्यार्थ्यांना सांगायला हवा. स्पर्धा परीक्षेतून चांगले करीअर घडण्यासह प्रशासकीय सेवेतून समाज सेवेचा अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे या उपक्रमातून विद्यार्थ्यांना करीअरचा राजमार्ग मिळेल, असे मत श्री.पाटील यांनी व्यक्‍त केले. "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या प्रश्‍नमालेतून विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला. 

भावी आयुष्यात विद्यार्थ्यांसाठी-उपक्रम उपयुक्‍त : यतींद्र पाटील 
"सकाळ'तर्फे हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून, जिल्हा परीषद नेहमीच सर्वोत्परी मदतीसाठी तयार आहे. उपक्रमात सहभागी सर्वच अधिकारी होतील, असे नाही. परंतु उपक्रमात सहभागी होऊन केलेल्या अभ्यासाचा उपयोग शेती, व्यवसायासह भावी आयुष्यात उपयोगी पडेल, असे मत यतींद्र पाटील यांनी व्यक्‍त केले. उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसीत होतील, असे त्यांनी नमुद केले. 

गुणवत्ता वाढीला-वाव : डॉ.झनकर 
जिल्हा परीषदेमार्फत "कट्टा शिक्षणाचा' आणि "सकाळ'च्या माध्यमातून "शाब्बास गुरूजी'द्वारे शिक्षण क्षेत्रात बदल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अधिकारी व्हायचंय मला उपक्रमातून विशेषत: ग्रामीण भागातील गुणवत्ता वाढीसाठी भरपुर वाव असल्याचे मत डॉ.वैशाली झनकर-वीर यांनी व्यक्‍त केले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक, बौद्धिक भुक भागविण्यासह त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद- मनिषा पवार 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे लहानपणी स्वप्न पाहिले होते. आज विद्यार्थ्यांना उपक्रमाच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ उपलब्ध झाल्याने आनंद होतो आहे. माझ्यासारख्याच ग्रामीण भागातील सामान्य घरातील मुलींची स्वप्नपूर्ती होत असल्याचा आनंद असल्याचे मत मनिषा पवार यांनी व्यक्‍त केले. होतकरू, गरजु विद्यार्थिनींना सर्वोत्परी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 

परीवर्तन घडविण्यासाठी उपक्रमात हवे सातत्य-निलीमाताई पवार 
भावी पिढी घडविण्याच्या दृष्टीने "सकाळ'च्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. मविप्र सारख्या सामाजिक संस्थेत काम करतांना ग्रामीण भागातील प्रश्‍न जवळून अनुभवले आहेत. परीवर्तन घडविण्यासह देशाचा विकासासाठी चांगले अधिकारी प्रशासकीय सेवेत आले पाहिजे. अधिकारी व्हायचंय मला सारख्या उपक्रमात सातत्य राखून या उद्दीष्टाची पूर्ती करावी, असे मत श्रीमती नीलिमाताई पवार यांनी व्यक्‍त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com