vidhan sabha 2019 नाशिकमध्ये मतदारांचा चांगला प्रतिसाद,केंद्राबाहेर लांबच लांब रांगा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 October 2019

नाशिकः विधानसभेच्या मतदानासाठी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण,आदिवासी भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसला. लांबच लांब रांगा केंद्राबाहेर पहायला मिळाला. नवमतदार,दिव्यांगाबरोबरच जेष्ठांनी मतदारांना हक्क बजावला. नाशिक शहरांसह ग्रामीण भागात पावसाची रिमझिम सुरुच आहे मात्र मतदार घराबाहेर पडून मतदान करत आहे. माजी उपमुख्यमंत्री व येवला मतदार संघातील आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी विविध केंद्रांना भेट देत पाहणी केली, मतदारांशी संवाद साधत मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी केले.
 

नाशिकः विधानसभेच्या मतदानासाठी शहरात तसेच जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामीण,आदिवासी भागात मतदारांचा मोठा उत्साह दिसला. लांबच लांब रांगा केंद्राबाहेर पहायला मिळाला. नवमतदार,दिव्यांगाबरोबरच जेष्ठांनी मतदारांना हक्क बजावला. नाशिक शहरांसह ग्रामीण भागात पावसाची रिमझिम सुरुच आहे मात्र मतदार घराबाहेर पडून मतदान करत आहे. माजी उपमुख्यमंत्री व येवला मतदार संघातील आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ यांनी विविध केंद्रांना भेट देत पाहणी केली, मतदारांशी संवाद साधत मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन त्यांनी केले.
 

 सकाळी सात ते आठ यावेळेत सर्वच केंद्रावर मतदारांचा अल्प प्रतिसाद लाभला. आठ-सव्वाआठनंतर मात्र कुटूंबासह गटागटाने येणारे मतदार दिसले. नाशिक शहरात जिल्हाधिकारी डॉ.सुरज मांडरे,पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील,महापौर रंजना भानसी यांच्यासह महायुतीचे उमेदवार प्रा.देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, योगेश घोलप, संभाजी पवार,अनिल कदम,दादा भुसे,डॉ.राहुल आहेर,महाआघाडीचे अपूर्व हिरे,दिपीका चव्हाण,सरोज आहिरे,दिलीप बनकर,तुषार शेवाळे,आसिफ शेख आदीनी मतदान केले. या सर्वांनी मतदानासाठी लोकांनी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे, टक्केवारी वाढवावी असे आवाहन केले. 
निवडणूक कर्मचारी चिखलात 
नाशिकरोडच्या आचार्य आनंद ऋषीजी शाळेत निवडणूक कर्मचाऱ्यांना परिसरात बसण्यासाठी जागा नसल्याने ते अगोदर चिखलातच खाली बसले होते, मात्र त्यानंतर काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत एका बंगल्याच्या आवारात खुर्च्या टाकून दिल्या.

केंद्र बदल्याने चांगला प्रतिसाद
  लोकसभा निवडणुकीत राणेनगर येथील सेंट फ्रान्सिस शाळेत दुसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र ठेवण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे यंदा येथील सर्व बूथ तळमजल्यावर ठेवण्यात आल्याने या केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत आहे.

उमेदवारांसह नवमतदार,जेष्ठांचा उत्साह
दिंडोरी- पेठ विधानसभा मतदारसंघात आमदार नरहरी झिरवाळ यांच्या वानरे गावात मतदानासाठी सकाळ पासून रांगा लागल्या होत्या. चांदोरीतील मतदान केंद्रावर नवमतदारांचा उत्साह दिसला. लोकशाही बळकट करण्याबरोबरच देश हित जोपासण्यासाठी आज प्रथम मतदान केलं अशी प्रतिक्रीया मतदान केल्यानंतर पूजा विजय जाधव हिने नोंदवली.
   सोयगाव नववसाहतीतील शुभदा विद्यालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, पत्नी अनिता, मुले अजिंक्य व अविष्कारसह मतदान केले. मालेगाव 
मोसमपुल मराठी शाळेत कुटुंबियांसह मतदान केल्यानंतर मालेगाव बाह्य काँग्रेस आघाडीचे उमेदवार डाँ. तुषार शेवाळे, पत्नी डाँ. निता, मुलगा अजिंक्य, मुलगी अनुजा.
 बागलाणच्या विद्यमान आमदार व काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांनी मुलगा प्रसादसह मतदानाचा हक्क बजावला तर मालेगावचे 
महापौर रशीद शेख व माजी महापौर ताहेरा शेख यांनी तर मालेगाव मध्य काँग्रेस उमेदवार आमदार आसीफ शेख यांनी मतदान केले.

व्हिव्हिपॅड यंत्रात बिघाड
 निफाड लासलगाव जवळील ब्राम्हणगाव विंचुर येथे व्हिव्हिपँड मशिनमध्ये ऐरर आल्याने काही काळासाठी निवडणुक प्रक्रीया थांबविण्यात आली होती, मात्र त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा मतदान सुरळीत सुरु झाले. रासेगाव (दिंडोरी) मतदारांच्या लागल्या रांगा दिसल्या मात्र या केंद्रावर मशीन चुकीची वेळ दाखवत असल्याने ते तातडीने बदलले, ठाणगाव,नांदगाव,मनमाड या भागातील केंद्रावरही चांगला प्रतिसाद मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news casting today