कोरोनासोबत याचीही दहशत; नागरीकांचे बाहेर निघणेच झाले कठीण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

परिसरात घटनांचे सत्र थांबायला तयार नसुन शेतकरी शेतात जाण्यासाठी देखील धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या भीतीने घराबाहेर कुणीही निघत नाही. या आशा भीतीत बिबट्याने पुन्हा वर डोके काढले आहे.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : कोरानाच्या भीतीने पहीलेच घबराट पसरली आहे. बिबट्याचे थांबलेले हाल्ले पुन्हा सुरू झाले आहेत. वरखेडे (ता.चाळीसगाव) या शिवारात बिबट्याने पाच बकर्याचा फडशा पाडल्याची घटना ताजी आसतांना आज पुन्हा एका वासराचा फडशा पाडल्याची घटना आज पहाटे सातला उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.या भागात पिंजरा ठेवावा आशी मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे.

वरखेडे (ता.चाळीसगाव) येथे  आठ दिवसापुर्वी  पाच बकर्याचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना ताजी  आसतांना आज पुन्हा दरेगाव रसत्यालगत भगवान जामसिंग पाटील यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा पाडल्याची घटना आज सकाळी सातला त्यांचा मुलगा प्रदिप याच्या लक्षात आली.या घटनेनंतर या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी वनविभागाचे मना गायकवाड यांनी पहाणी करुन वनविभागाला कळविले होते.या परिसरात घटनांचे सत्र थांबायला तयार नसुन शेतकरी शेतात जाण्यासाठी देखील धजावत नसल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या भीतीने घराबाहेर कुणीही निघत नाही. या आशा भीतीत बिबट्याने पुन्हा वर डोके काढले आहे.

वनविभागाने पिंजरा लावावा...
वरखेडे(ता.चाळीसगाव)परीसरात बिबट्याची हाल्ले वाढले आहेत. दरेगाव भागात सर्वाधिक हाल्ले झाले आहेत.शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन देखील झाले आहे. या भागात बिबट्या नाव जरी कानावर पडले तरी भीती निर्माण होते.या भागात असलेला बिबट नरभक्षक होणार नाही यासाठी पिंजरा लावण्याची गरज असुन या संदर्भात वनविभागाने उपाययोजना करुन पिंजरा व  कँमेरे लावावे व बिबट्याचा  बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

मजुरांमध्ये भीती
गिरणा परिसरात सध्या शेतांमध्ये पिंकाना रात्रीचे पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जावे लागते.पिके काढणीची  कामेही सुरू आहेत. त्यासाठी मजुरांना शेतांमध्ये जावे लागते.बिबट्याच्या भीतीमुळे मजुर शेतांमध्ये जाण्यासाठी घाबरतात. महिला मजुरांनी तर बिबट्याची प्रचंड धास्ती घेतली आहे.वरखेडे परिसरातील यापूर्वी बिबट्याचे झालेले हल्ले आजही मजुरांच्या ऊरात धडकी भरवतात.पंधरा दिवसापुर्वी  पाटचाऱ्यांची पाण्याची पाहणी करण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघालेल्या गिरणा पाटबंधारे पथकाच्या वाहना समोर अचानक झडप घेत आलेल्या बिबट्याचे चालकाने प्रसंगावधाने प्राण वाचवले होते.

गिरणा पट्यात आतापर्यंत तीन  बिबट कैद 
गिरणा परिसरातील वरखेडे (ता.चाळीसगाव) येथे दोन वर्षांपूर्वी नरभक्षक बिबट्या मारला गेल्यानंतर या भागात बिट्यांचा मुक्काम वाढलाच आहे. पिंपळवाड म्हाळसा (ता.चाळीसगाव)येथील विजय देशमुख यांच्याच शेतात (ता.22) आँक्टोंबर 2018 ला बिबट्या जेरबंद करण्यात आला होता. त्यानंतर पंधरा दिवसांत वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील कोमल मानसिंग पाटील यांच्या शेतात (ता.9) नोव्हेंबर 2018 ला बिबट्या जेरबंद झाला होता.या बिबट्याने 60 च्या वर पशुधनाचा बळी घेतला होता. तिसरा बिबट्या पुन्हा विजय देशमुख यांच्या शेतात पिंजर्‍यात कैद झाला. गिरणा परीसरात बिबट्याचा वावर वाढला असून एक गेला की दूसरा लगेचच येतो त्यामुळे आता पुन्हा नवीन बिबट्या सक्रीय झाल्याने ग्रामस्थांमध्ये  भीती पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon bibtya agian attack people not out of home