लॉकडाऊन' मध्ये सलून दुकान उघडले...अन्‌ पाच जणांवर  दाखल झाले गुन्हे ! 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 4 एप्रिल 2020


‘लॉकडाऊन’ मध्ये  सलून दुकानात दाढी करणे दुकानदारांसह पाच जणांना चांगलेच महागात पडले.

चाळीसगाव ः कोरोना' संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी केंद्र शासानाने "लॉकडाऊन' पुकारले आहे. 
 परंतू ‘लॉकडाऊन’ मध्ये  सलून दुकानात दाढी करणे दुकानदारांसह पाच जणांना चांगलेच महागात पडले. पोलिसांनी पाचही जणांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे यांना शहरातील सलून दुकान शटर बंद करून आतमध्ये सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, उपविभागीय कार्यालयाचे पोलीस अंमलदार अमोल कुमावत व दिनेश पाटील तसेच शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार भटू पाटील, शरद पाटील, महेश बागूल यांच्या पथकाने येथील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दीपक हेअर पार्लर येथे या सलून दुकानावर काल (३ मार्च) अचानक धडक दिली. या दुकानात दुकान मालकासह पाच जण मिळून आले. याप्रकरणी दीपक शिंदे, प्रद्युम्न शिंदे, कैलास येवले, सौरभ कोळी व अजय गुरव या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon By continuing the salon shop Five were booked against the accused

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: