शेताच्या बांधावर खेळत होते झन्नामन्ना...पोलिस आले अन्‌ झाले असे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 एप्रिल 2020

शेताच्या बांधावर पैसे लावून झन्नामन्ना नावाचा जुगारावर मेहूणबारे पोलीसांनी काल रात्री छापा टाकला.या कारवाईत पोलीसांना केवळ 710 रूपयांची रोकड हाती लागली. सुमारे 1 लाख 5 हजार रूपये किंमतीच्या 5 मोटारसायकली पोलीसांनी जप्त केल्या.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : आडगाव (ता.चाळीसगाव) शिवारात पाटचारीलगतच्या शेताच्या बांधावर पैसे लावून झन्नामन्ना नावाचा जुगारावर मेहूणबारे पोलीसांनी काल रात्री छापा टाकला.या कारवाईत पोलीसांना केवळ 710 रूपयांची रोकड हाती लागली. सुमारे 1 लाख 5 हजार रूपये किंमतीच्या 5 मोटारसायकली पोलीसांनी जप्त केल्या. या कारवाईत पाच जण पोलीसांच्या हाती लागले तर इतर पाच जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. याप्रकरणी 10 जणांच्या विरोधात मेहूणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपूर्ण देशात कोरोना या विषाणूचा संसर्ग असल्याने सदर रोगावर प्रतिबंधक उपाय म्हणून जिल्हाधिकारी जळगाव यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात येत असतांना आडगाव शिवारातील पाटचारीलगत जिभाऊ पाटील यांच्या शेताजवळील बांधावर काही लोक एकत्र येवून आपल्या फायद्यासाठी 52 पत्यावर झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बेंद्रे यांना मिळाली,अरूण पाटील, कमलेश राजपूत, होमगार्ड मनोज पाटील, संदीप बोराडे, ईश्वर चव्हाण, तौसिफ पठाण यांच्या पथकाने काल (ता.15)रोजी रात्री 11.55 वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत खुशाल सोनवणे, शैलेश  पाटील, अमोल पाटील, कल्पेश निकम, वाल्मीक पाटील सर्व रा. आडगाव यांना जुगार खेळतांना अटक केली. तर संभा पाटील, सचिन पाटील, समाधान पाटील, चेतन पाटील, मनोज पाटील हे पळून गेले.पोलीसांनी कारवाईत रोख 710 रूपये व पत्याचा कॅट तसेच 1 लाख 5 हजार रूपये किंमतीच्या पाच मोटारसायकली असा सुमारे 1 लाख 5 हजार 710 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून 10 जुगारींच्या विरोधात कमलेश राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार व  जिल्हाधिकारी यांचे करोना संसर्गजन्य आजाराचा फैलाव होण्याचा संभव आहे म्हणून  संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून घातक कृती करतांना मिळून मिळून आल्याने  गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon farm night jugar and police fir