esakal | नेत्यांचे फोटो होळीमध्ये दहन करत... शेतकऱ्यांनी ठोकल्या बोंबा ! 
sakal

बोलून बातमी शोधा

नेत्यांचे फोटो होळीमध्ये दहन करत... शेतकऱ्यांनी ठोकल्या बोंबा ! 

बोढरे गावात होळीच्या दिवशी फडणवीस सरकारच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, खासदार उन्मेश पाटील नेत्यांचे फोटो होळीला लावून होळीचे दहन करून नेत्यांच्या नावाच्या बोंबा मारुन निषेध व्यक्त केला. 

नेत्यांचे फोटो होळीमध्ये दहन करत... शेतकऱ्यांनी ठोकल्या बोंबा ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव ः बोढरे (ता. चाळीसगाव) येथील सोलर प्रकल्प पिडीत शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे झालेल्या फसवणुकीचा निषेध म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, खासदार उन्मेश पाटील यांच्या फोटो होळीला लावून ही होळी दहन करून निषेध व्यक्त केला. 

फडसवीस सरकारच्या काळात सोलर प्रकल्पासाठी बोढरे, पिंपरखेडे, शिवापूर, लोंजे गावातील सुमारे बाराशे हेक्‍टर शेतजमीन कवडीमोल भावाने धानाढ्य उद्योगपतींना देण्याचा प्रकार केला होता. या निषेधार्थ बोढरे गावात होळीच्या दिवशी फडणवीस सरकारच्या देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, खासदार उन्मेश पाटील नेत्यांचे फोटो होळीला लावून होळीचे दहन करून नेत्यांच्या नावाच्या बोंबा मारुन निषेध व्यक्त केला. 

आणि यांना केला नमस्कार ! 
सोलर प्रकल्पाच्या पिडीतांना मदत करावी म्हणून शेतकऱ्यांनी होळी दहन करण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमा समोर ठेवून शेतकऱ्यांनी हात जोडून नमस्कार करत मदतीची अपेक्षा व्यक्त केली. 

loading image
go to top