दुध दरवाढीसंदर्भात आडगाव येथे आंदोलन

गणेश पाटील
सोमवार, 16 जुलै 2018

चाळीसगाव : शासनाने केलेली दुधाची दरवाढ शेतकर्‍यांना मान्‍य नसुन शेतकर्‍यांनी सांगीतल्‍याप्रमाणे दुधाची दरवाढ करण्‍यात यावी या मागणीसाठी चाळीसगाव तालुक्‍यातील आडगाव येथे सोमवारी, दि.16  स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्‍यक्ष आर.के.पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्‍यात आले. यावेळी शेतकर्‍यांनी आणलेले दुध आंदोलनकर्‍त्‍यांना वाटप करण्‍यात आले. 

शासनाकडून सध्‍याचे दुधाला 17 रूपये प्रतिलिटरप्रमाणे दर देण्‍यात आले आहेत. ढेपेचे वाढीव दर व चार्‍यांची टंचाई लक्षात घेता शासनाने दिलेले दुधाचे दर परवडणारे नसुन शेतकर्‍यांना तब्‍बल 28 रूपये प्रतिलिटरप्रमाणे दुधाचे दर देण्‍यात यावे या मागणीसाठी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍यावतीने तालुक्‍यातील आडगाव येथे शेतकरी व दुध उत्‍पादकांनी आंदोलन केले. सकाळी साडे आठ ते साडे नउ वाजेपर्यंत आडगाव येथे रास्‍ता रोको करून दुधदरवाढीसंदर्भात आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यानंी मागीतलेला भाव दुधाला मिळावा या मागणीसाठी करण्‍यात आलेल्‍या आंदोलनाप्रसंगी तालुक्‍यातील पिंपळवाड म्‍हाळसा, अलवाडी, देशमुखवाडी, टाकळी प्र.दे, पिप्री व शिरसगाव येथील शेतकर्‍यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. आंदोलनाप्रसंगी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मेहूणबारे पोलीसांनी कडक बंदोबस्‍त ठेवला होता. यावेळी आंदोलनकर्‍त्‍यांनी आपल्‍या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांना दिले. आंदोलनात स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष आर.के.पाटील, सुभाष पाटील, वाल्‍मीक पाटील, सुपडू निकम, पी.के.पाटील, प्रशांत पाटील, हर्षवर्धन पाटील, यशवंत पाटील, राजु पाटील, बापू माळी, खुशाल महाजन, किरण देशमुख यांच्‍यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्‍थित होते. 

दुध वाटप करून अनोेखे आंदोलन
शेतकर्‍यांनी तथा दुधउत्‍पादकांनी आंदोलनाच्‍यावेळी दुध आणले होते. परंतु हे दुध रस्‍त्‍यावर किंवा इतरत्र न पेकता या दुधाची आंदोलन कर्‍त्‍यांना वाटप करण्‍यात आली. या अनोख्‍या अांदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू होती. मागणी मान्‍य करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्‍याचा निर्धार यावेळी करण्‍यात आला आहे.

Web Title: marathi news chalisgaon former dudha aandolan