"हेअर डाय' करणे पडले महागात ! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 एप्रिल 2020

सध्याच्या "लॉकडाउन'च्या काळात केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने विशिष्ठ वेळेत उघडी ठेवण्याची परवानगी असताना हेअर कटिंग सलूनचे दुकान उघडे ठेवून दुकानात हेअरडाय करणे दोघांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चाळीसगाव (जळगाव) ः सध्याच्या "लॉकडाउन'च्या काळात केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने विशिष्ठ वेळेत उघडी ठेवण्याची परवानगी असताना हेअर कटिंग सलूनचे दुकान उघडे ठेवून दुकानात हेअरडाय करणे दोघांना चांगलेच महागात पडले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
शहरातील पवार वाडीतील मुंदडा हॉस्पिटल जवळील श्री हेअर पार्लरमध्ये हे दुकान आज सकाळी साडेआठला उघडे ठेवून त्यात हेअर डाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, येथील पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, अंमलदार पंढरीनाथ पवार, विनोद खैरनार, विजय पाटील व सतीश राजपूत यांच्या पथकाने श्री हेअर पार्लरमध्ये जाऊन पाहणी केली असता, हे दुकान जीवनावश्‍यक वस्तूंची आस्थापना नसतानाही खुले ठेवून त्यात गिऱ्हाइकाच्या केसांना डाय करीत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी राजेश नथू महाले (रा. पवारवाडी, चाळीसगाव) व विलास रामकृष्ण कासार (रा. शेजवलकर नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व जीवनावश्‍यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर दुकाने उघडी ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon hair dye has to be expensive