coronavirus : कोरोनामुळे अजिंठा लेणी पडली ओस

विलास जोशी
शुक्रवार, 13 मार्च 2020

हॉटेल व्यावसायला मोठा फटका बसला आहे. खबरदारी म्हणून लेणीतील कर्मचाऱ्यांना मास्क आणि हॅण्डग्लोज देण्यात आली असल्याची माहिती साहाय्यक संवर्धक डी. एस. दानवे यांनी दिली.

वाकोद (ता. जामनेर) : सध्या कोरोना मुळे सर्वदुर परिणाम जाणवत असून, त्याचा फटका सध्या पर्यटन क्षेत्रालाही बसत आहे. अजिंठा लेण्यामधे देखील सद्यःस्थितीला शुकशुकाट झालेला दिसून येत आहे. दोन्ही ठिकाणी पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली असून, देशी पर्यटकासोबत विदेशी पर्यटक देखील धास्तावले आहेत.

क्‍लिक करा - ते एटीएमवर पैसे काढण्यास आले पण आतमध्ये दिसले भलतेच काही 

मागील वर्षी याच एक महिन्यात विदेशी पर्यटकांची संख्या ४२१८ इतकी होती; तिच संख्या या वर्षी याच कालावधीत हजाराने घटली असून, विशेष म्हणजे कोरोनाची सुरुवात झाल्यापासून चीन चा एकही पर्यटक लेणी मध्ये फिरकताना दिसत नाही. सध्या कोरोनाचा वाढता जोर लक्षात घेता, यापुढे देखील ही संख्या घटण्याची चिन्हे दिसत आहे.

मागील वर्षी १ फेब्रुवारी ते १० मार्च २०१९ या दरम्यान, अजिंठा लेणीस भेट देणारे ४ हजार २१८ परदेशी पर्यटक आले होते. तर यंदा १ फेब्रुवारी ते १० मार्च २०२० दरम्यान ३ हजार २०२ विदेशी पर्यटक आले होते. यावरून विदेशी पर्यटकांनी कमालीची धास्ती घेतलेली जाणवते. यामुळे येथील व्यावसायिकांना देखील याचा फटका होत असून, काही ठिकाणी हॉटेल्स मध्ये आधीच केलेली बुकिंग सुद्धा रद्द केली जात आहे. यामुळे हॉटेल व्यावसायला मोठा फटका बसला आहे. खबरदारी म्हणून लेणीतील कर्मचाऱ्यांना मास्क आणि हॅण्डग्लोज देण्यात आली असल्याची माहिती साहाय्यक संवर्धक डी. एस. दानवे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus ajintha leni foreign Tourist Number down