कोरोनाला थोपविण्याचे अमळनेरला आव्हान 

योगेश महाजन
मंगळवार, 5 मे 2020

परिसरात 25 कोरोनाबधित असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अजूनही नागरिक गांभीर्याने घेत नसून विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर कडक करवाई होणे गरजेचे आहे. 

अमळनेर  : कोरोना संसर्गाचा आकडा पाहता अमळनेर शहरा हॉट स्पॉट ठरले आहे. किरोनाने शहरात पाय पसरले असून बाधितांची संख्या तिसच्या वर पोचली आहे. कोरोनाला थोपविण्याचे प्रशासन, लोकप्रतिनिधींपुढे आव्हान  आहे. विशेष पॅटर्न राबविण्याची गरज आहे. 
शहरातील सळीवाडा, झामी चौक, अमलेश्वर नगर व शाह आलम नगर 'कंटेंटमेंट झोन' म्हणून जाहीर झाले आहेत. या परिसरात 25 कोरोनाबधित असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अजूनही नागरिक गांभीर्याने घेत नसून विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यांच्यावर कडक करवाई होणे गरजेचे आहे. 

जमावबंदी आदेशाकडे दुर्लक्ष
जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारपासून (ता. ३) जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र, तरीही नागरिक बिनधास्तपणे फिरताना दिसत असून, त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. अनेक जण खोटी कारणे दाखवत गर्दी करताना दिसत आहेत. शहरातील अनेक गल्ली, कॉलन्यांमध्ये तरूण एकत्र टोळके करून उभे राहताना दिसतात.

'त्या' परिसरातील नागरिक भयभीत
साळीवाडा भागातील एका दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. यात महिलेचा मृत्यू झाला असून अनेकांना संसर्ग झाला. त्यातील काहींवर उपचार सुरू आहेत. परिणामी या परिसरातील नागरिक जीव मुठीत घेऊन घरातच बसले आहेत. ते भयभीत झाले असून जनजागृती करण्याची गरज आहे. 

प्रशासनाचे दुर्लक्ष
साळीवाडा, अमलेश्वर नगर, झामी चौक व शाह आलम नगर हे भाग कंटेंटमेंट झोन आहेत. मात्र, या परिसरात रोज सॅनिटायझर फवारणी, स्वछता करणे गरजेचे आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. हा परिसर रोज निर्जंतुक करावा अशी मागणी होत आहे. 

सोशल डिस्टनसिंगचा विसर
शासनाने आजपासून काही प्रमाणात व्यवहार सुरू करण्यास मुभा दिली आहे. मात्र, तरी बाजरात, बँकांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. नागरिकांनी गर्दी करणे टाळायला हवे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत असले तरी नागिरक याकडे दुर्लक्ष करत आहेत.

मुंगसेकरांना दिलासा
तालुक्यातील मुंगसे येथे एका 57 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेवर जळगाव येथे उपचार सुरू होते. त्यांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आल्याने मुंगसे परिसराला दिलासा मिळाला आहे.

अमळनेर शहरातील कोरोनाबधितांची संख्या कंसात मृतांची संख्या
साळीवाडा 10 (02)
अमलेश्वर नगर 05 (01)
शाह आलम नगर 03 (02)
झामी चौक 05 (01)
बोरसे गल्ली 01 (0)
कसाली मोहल्ला 01 (0)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news corona virus chain stop challenge amalner