esakal | Video गावी येण्यासाठी सुरतहून पायी प्रवास

बोलून बातमी शोधा

surat ner

रोजगार मिळवून गुजरान करण्यासाठी खानदेशातील बहुतांशजण गुजरात राज्यातील सुरत, उधणा येथे स्थायीक झाले आहेत. परंतु कोरोना व्हायरसमुळे सर्वच बंद असल्याने कंपन्या देखील बंद पडल्या आहेत. यामुळे थांबून काय करायचे?

Video गावी येण्यासाठी सुरतहून पायी प्रवास
sakal_logo
By
तुषार देवरे

देऊर : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी सर्वत्र बंदोबस्त असतांना खानदेशातून बहुतांश कुटुंब गुजरात राज्यात उदर निर्वाहासाठी गेले आहेत. तेथे कारखाने, कंपनी बंद असल्याने आपल्या मूळ गावी नागरिकांचे जत्थेच्या जत्थे येत आहेत. येण्याची सुविधा नसल्याने नागरीक पायीच चालत मार्गक्रमण करत आहेत. हे नागरिक महामार्ग क्रमांक सहावरील गावातून रात्री, अपरात्री, पहाटे येत आहे. 

रोजगार मिळवून गुजरान करण्यासाठी खानदेशातील बहुतांशजण गुजरात राज्यातील सुरत, उधणा येथे स्थायीक झाले आहेत. परंतु कोरोना व्हायरसमुळे सर्वच बंद असल्याने कंपन्या देखील बंद पडल्या आहेत. यामुळे थांबून काय करायचे? यापेक्षा गावी गेलेले बरे..या विचारातून मार्गक्रमण करत आहेत. येण्यासाठी ना रेल्वे आहे; ना बस...यामुळे पायी चालतच गाव गाठत आहेत. नागरिकांना वाहने नसल्याने पायी प्रवास करण्याची वेळ आली आहे. याचा एक तोटा असा होत आहे. गोपनीय येणारे नागरिकांची बहुतांश ठिकाणी दप्तरी नोंद, आरोग्य तपासणी झाली नसल्याची माहिती महामार्गावरील गावातील जागृत नागरिकांनी आज 'सकाळ' शी बोलतांना दिली. आगामी धोका होऊ नये. या पार्श्वभूमीवर या नागरिकांसाठी शासनाने वाहनाची व्यवस्था केली तर, येण्याचा प्रश्न व आरोग्य तपासणी होऊन नोंद होईल. 

गावात झाला प्रवेश 
सुरत, उधणा येथून येणाऱ्या नागरिकांना महामार्गावरील गावाजवळ खासगी वाहन सोडून जात आहे. आज सकाळी नेर गावाजवळील मोठ्या पुलाजवळ अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने पंचवीस व्यक्तींना सुरत कडून सोडून गेले. काम नसल्यामुळे कामाच्या ठिकाणावरुन हुडकवून लावण्यात येत आहे. त्यांनी गावी येण्यासाठी जीवघेणा प्रवास सुरु केला आहे. कधी पायी तर कधी कुठले वाहन मिळाले त्यातून प्रवास करणे सुरू आहे. शासन कागदोपत्री खूप काम करतेय वास्तविक परिस्थिती वेगळी आहे. अशा लोकांना होम क्वारंटाईन करण्यासाठी व त्याच्या मूळ गावी पोहचवण्यासाठी शासनाने योग्य ती मदत करावी. अशी मागणी सरपंच शंकरराव खलाणे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मनिष जोशी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीष बोढरे, देविदास माळी पोलिस पाटील विजय देशमुख ,रतिलाल माळी, श्री. मगरे यांनी केली आहे.