नाट्यलेखक दत्ता पाटील यांना  "चैत्र चाहूल रंगकर्मी' सन्मान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

नाशिकः मुंबईतील "चैत्र चाहूल'तर्फे देण्यात येणारा यंदाचा रंगकर्मी सन्मान नाशिकमधील नव्या पिढीचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांना जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 18 मार्चला सायंकाळी साडेपाचला मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरमध्ये होणाऱ्या सोहळ्यात खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांच्या हस्ते त्यांचा गौरव होईल. 

संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार विजेते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनाही गौरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ लेखक किरण नगरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या सोहळ्यानंतर "सॉरी परांजपे' ही एकांकिका सादर होईल. "चैत्र चाहूल'तर्फे दरवर्षी रंगकर्मी सन्मान व रंगकर्मी ध्यास सन्मान हे दोन पुरस्कार नाट्यक्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या रंगकर्मींना दिले जातात. रंगकर्मी ध्यास सन्मानासाठी अविनाश गोडबोले यांची निवड झाली आहे. चैत्र चाहूलतर्फे आतापर्यंत मुक्ता बर्वे, प्रदीप मुळ्ये, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, अरुण होर्णेकर, संजना कपूर, गणपत म्हसगे आदींना सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, दत्ता पाटील हे गेली 15 वर्षे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत आहेत. "हंडाभर चांदण्या', "गढीवरच्या पोरी', "स्ट्रॉबेरी', "कृष्णविवर', "बगळ्या बगळ्या कवडी दे', "मध्यमपदलोपी', "कस्टर केअर' यासह अनेक यशस्वी नाटक आणि एकांकिकांचे त्यांनी लेखन केले आहे. 
 
Web Title: marathi news datta patil award