esakal | सापळा रचून अवैध रेती वाहतुक करणाऱयांवर महसुल विभागाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

सापळा रचून अवैध रेती वाहतुक करणाऱयांवर महसुल विभागाची कारवाई

नदीपात्रात रात्रंदिवस अवैधपणे रेती वाहतूक सुरू असून रेती चोरांवर ग्रामपंचायतीचे व अधिकाऱ्यांचे वचक नसल्यामुळे रिती चोरांची मुजोरी वाढलेली आहे.

सापळा रचून अवैध रेती वाहतुक करणाऱयांवर महसुल विभागाची कारवाई

sakal_logo
By
विशाल रायते

न्याहाळोद:  येथील कौठळ रस्त्यालगत पांझरा नदी पात्रात अवैधपणे रेती वाहतूक गेल्या कित्येक महिन्यापासून सुरू असून महसूल विभागाने सापळा रचून रेती ट्रॅक्टर पकडले असून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.                                  
गेल्या कित्येक महिन्यांपासून न्याहाळोद कौठळ तसेच जापी रस्त्यालगत नदीपात्रात रात्रंदिवस अवैधपणे रेती वाहतूक सुरू असून रेती चोरांवर ग्रामपंचायतीचे व अधिकाऱ्यांचे वचक नसल्यामुळे रिती चोरांची मुजोरी वाढलेली आहे. शासकीय मालमत्ता रात्रंदिवस चोरीला जात आहे, याच्यावर वचक नसल्यामुळे रेती वाहतूक सर्रासपणे सुरू असते यामुळे उन्हाळ्यात पाणी समस्या गळत होते न्याहळोद तसेच परिसरात बाहेर गावांना पाणी दिले जात असून नऊ ते दहा वाटर सप्लाय विहिरी असून तेथेच नेमकी रेती चोरी होत आहे याकडे ग्रामपंचायत अनभिज्ञ आहे.

सापळा रचला आणि कारवाई

रेती चोरी होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी यांनी सापळा रचला. ट्रॅक्टर मध्ये रेती भरत असतांना हे ट्रक्टर सापडले मंडलाधिकारी सी यु पाटील, सोनगीर पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, दीपक महाजन, जितेंद्र बांगर, योगेश जिरे, वसंत अहिरराव धाकु वाघ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे