esakal | मान्यता नसलेले कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना घरपाचे; कृषी विभागाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

cotton seeds

मान्यता नसलेले बियाणे शेतकऱ्यांना घरपाचे; कृषी विभागाची कारवाई

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दोंडाईचा (धुळे) : येथील श्रीनाथ फर्टिलायझर्स बियाणे विक्रेताच्या शॉपिंगवर कृषी अधिकाऱ्यांच्या छाप्यात गुजरात राज्यातील ३६ हजार ८०० रुपये किंमतीचे (Gujrat transport cotton seeds) विक्रीस मान्यता नसलेले बोगस कापूस बियाणे (Duplicate cotton seeds) जप्त केले. या प्रकरणी नंदूरबारच्या शैलेश वाणीसह कृषी सेवा केंन्द्राचे संचालक कमलेश कुंभार यांच्या विरोधात दौंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (dhule-agricalture-department-action-illegal-cotton-seeds-seals)

हेही वाचा: आश्रमशाळेसाठी शिक्षण सेतू अभियान

दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Agricultural Produce Market Committee dondaicha) शॉपिंग कॉम्पलेक्समधील श्रीनाथ फर्टीलायझसे बियाणे विक्री केंद्रात गुजरात राज्यातील कापूस बियाणे विक्रीला परवानगी नाही. असे आरकॉट ५५, फोरजी या जातीचे बोगस कापूस बियाणे विक्रीसाठी दुकानात आढल्याने हे बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणुक केली जात होती. बियाणे कायद्यान्वये तालुका कृषी अधिकारी योगेश गिरासे, जिल्हा कृषी अधिकारी पी.एम. सोनवणे, मोहीम अधिकारी अभय कोर यांनी कारवाई करून शैलेश वाणी व कमलेश कूंभार यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा नोंद केला आहे.

मोठे मासे गळाला लागावे

दोंडाईचा व परीसरात विक्रीस परवाना नसतांना आणि मालक, उत्पादक यांचा पाकीटावर नामोल्लेख नसतांना गुजरात राज्यातील बोगस कापूस बियाणे विक्री करणाऱ्या दलालांचे मोठे रॅकेट सक्रीय आहे. यात शहर व ग्रामीण भागातील काही कृषीसेवा केंन्द्राचे मालक मोटार सायकलच्या डिक्‍कीत किंवा फोर व्हिलर वाहनात शेतकऱ्यांना घरपोच देतात. याचे बील देण्यात येत नसल्यामुळे फसवणुक झालेल्‍या शेतकऱ्याला गुपचूप राहण्याची वेळ येते. त्यामूळे शासनाच्याही महसूलाचे मोठे नुकसान होते. यामुळे अशा बड्या बियाणे तस्करांचा शोध घेतला जाणे शेतकऱ्याना अपेक्षीत आहे.