बारिपाडा येथे दोन कोटींचा सामंजस्‍य करार 

भिलाजी जिरे
Saturday, 6 February 2021

आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांची कंपनीच्या सदस्यानी वेळोवेळी भेटी घेऊन पाठपुरावा केला

बारिपाडा ः  बारिपाडा (ता. साक्री) येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत दोन कोटी रूपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. 

वाचा- टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन स्थगित !
 

पिंपळनेर येथील देशबंधू ऍग्रो रिसोर्स सेंटर या प्रोड्युसर कंपनीची स्थापना लुपीनच्या सि.एस.आर मधून २०१४ या वर्षी झाली. या कंपनीत ४५ गावातुन १०१६ शेतकरी सभासद असून ही कंपनी सुरू रहावी व भाग भांडवल वाढावे म्हणून लुपीन फाउंडेशनने सतत तीन वर्षांपर्यंत १० लक्ष रूपये बिनव्याजी परतफेड देत होती. कंपनीने वेळोवेळी ते पैसे परतही केले. तसेच कंपनीला जागा खरेदीसाठी ५० टक्के रक्कम लुपीनने दिली.

आवश्य वाचा- नवापूरला चिकन, अंडी विक्रीला बंदी; कोंबड्यांचा मृत्यूमुळे  प्रशासनाची धावपळ 
 

आदिवासी विकास विभागाने वीज जोडणीसाठी २०१९ मध्ये १९ लक्ष रूपये दिले. कंपनीने केंद्रीय विशेष सहाय्य अंतर्गत अनुषेश २७५ (१) अन्वये अनुदान प्राप्त करण्यासाठी २०१९-२० साठी अर्ज केला. शबरी आदिवासी वित्त विकास विभागाच्या मंडळामार्फत कंपनीचा प्रस्ताव दाखल केला. त्या अनुषंगाने आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांची कंपनीच्या सदस्यानी वेळोवेळी भेटी घेऊन पाठपुरावा केला त्याचा चांगला परिणाम म्हणून ४ फेब्रुवारीला महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या समोर बारिपाडा येथे शबरी आर्थिक विकास महामंडळाचे एम.डी. नितीन पाटील (आय.ए.एस) व कंपनीचे चेअरमन चैत्राम पवार यांच्यात २ कोटी १ लक्ष ९६ हजार या एम.ओ. यु.चे देवाण-घेवाण झाली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule baripada Reconciliation agreement two crore