esakal | दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या भाच्याचा दुर्दैवी मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या भाच्याचा दुर्दैवी मृत्यू

मामासोबत नदीकाठी असलेल्या शेतातील गाईला चारापाणी करण्यासाठी गेले असता मामा ईश्वर हा चारा घेण्यासाठी बाजूला गेला तोवर भाचा तन्मय याने पाण्याची बादली घेऊन नदीकाठी पाणी भरण्यासाठी गेला.

दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या भाच्याचा दुर्दैवी मृत्यू

sakal_logo
By
चंद्रकांत घरटे

सामोडे : नाशिक येथील तन्मय दिनेश पगारे (वय 12वर्ष)यांचा मामाच्या गावी सामोडे येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
नाशिक येथील ललिता दिनेश पगारे ही महिला दिवाळी निमित्ताने आपल्या माहेरी सामोडे येथे वडील सुभाष पांडुरंग तरटे , भाऊ ईश्वर सुभाष घरटे यांच्याकडे आपल्या बारा वर्षाचा मुलगा तन्मय व नऊ वर्षाची मुलगी परी यांच्यासोबत दिवाळीला आली होती. दिवाळीला चार दिवस होत नाही तोच दुःखाची लाट घरात पसरली.

आवश्य वाचा- रागाच्या भरात घरातून निघाली आणि भुसावळ स्टेशनमध्ये टी.सी स्टॉफच्या सतर्कतेमूळे सापडली -


तन्मय हा एकुलता एक मुलगा व एक लहाणं बहिण आहे.तो नाशिक येथे सातवीमध्ये शिकत होता . तन्मय चे वडील दिनेश पगारे हे गेल्या दोन तीन वर्षापासून बेपत्ता आहेत. अश्या परिस्थितीत तन्मयची आई ललिता पगारे व मुलगी परी यांच्यासोबत नाशिक येथे वास्तव्यात आहेत. ते तिघे दिवाळीसाठी सामोडेला आले होते तन्मय हा आज सायंकाळी 5:30 वाजताआपल्या मामासोबत नदीकाठी असलेल्या शेतातील गाईला चारापाणी करण्यासाठी गेले असता मामा ईश्वर हा चारा घेण्यासाठी बाजूला गेला तोवर भाचा तन्मय याने पाण्याची बादली घेऊन नदीकाठी पाणी भरण्यासाठी गेला असता पाय घसरून तो खोल पाण्यात पडला.

तन्मय मामा मामा ओरडला...

पाण्यात पडल्यावर तन्मयने मामा,मामा ओर केल्याने आजूबाजू असलेल्या मुलांनी व त्याच्या मामाने त्याला पाण्यातून बाहेर काढले. परंतू तन्मयची प्रकृती गंभीर होती त्याला पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे तातडीने पाठवण्यात आले येथे वैद्यकीय तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगीतले. या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसात दिली असून पुढील तपास सुरू आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे